ylliX - Online Advertising Network

kill Salman Khan सलमान खानला रस्त्यावरच मारण्याचा होता प्लॅन

सलमान खानला त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसच्या रस्त्यावरच मारण्याची योजना लॉरेन्स गँगने  बनवली होती, असा नवा खुलासा समोर आला आहे.

मागील चार वर्षांपासून लॉरेन्स बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आहे. या गँगने सलमानच्या हत्येचा यापूर्वी चार वेळा प्रयत्न केला. लॉरेन्स गँगने गेल्या तीन महिन्यांत सलमानवर हल्ल्याचे आणखी दोन प्रयत्न केले. मात्र, ते यशस्वी होऊ शकले नाहीत. पंजाब पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी कपिल पंडित याला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान सलमानच्या हत्येच्या कट रचल्याचे उघड करून कटाची माहिती पोलिसांना सांगितली. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यापूर्वी लॉरेन्सने सलमानला मारण्याचा कट रचला होता. गोल्डी बराड या प्लॅनचा सर्वेसर्वा होता. त्याने सलमानची हत्या करण्यासाठी कपिल पंडित (लाॅरेन्स टोळीचा शार्पशूटर) याची निवड केली होती.

शूटर्स दीड महिना थांबले, रेकीही केली
मुंबईच्या पनवेल भागात कपिल पंडित, संतोष जाधव, दीपक मुंडी आणि इतर शूटर भाड्याची खोली घेऊन थांबले होते. कारण, सलमानचे फार्म हाऊस याच भागात आहे. जवळपास दीड महिना ते या भागात थांबले होते. लॉरेन्स गँगच्या शूटर्सनी हल्ल्यासाठी खोलीत छोटी शस्त्रे, पिस्तूल व काडतूस ठेवले होते. हिट ॲण्ड रन घटनेनंतर सलमान खान गाडीचा वेग कमी ठेवतो. सलमान जेव्हा पनवेलच्या फार्म हाऊसवर येतो. तेव्हा त्याच्यासोबत त्याचा अंगरक्षक शेराही असतो, अशी माहिती या शूटर्सनी गोळा केली होती.

सलमानची हत्या का करायची आहे? 
सलमानने काळविटाची शिकार केल्यापासून लॉरेन्स त्याच्यावर नाराज आहे. तो तेव्हापासून सलमानची हत्या करू इच्छितो. आपला समुदाय काळविटाचा रक्षक आहे. त्यामुळे आपण सलमानचे प्राण घेऊ इच्छितो, असे लॉरेन्सने म्हटले आहे.

kill Salman Khan

गँगस्टर कपिल पंडीतनं दिलेल्या जबाबानुसार सलमान खानला मारण्यासाठीचा पूर्ण प्लान जवळपास निश्चित झाला होता. पनवेल येथील सलमानच्या फार्महाऊस जवळच सुमारे दीड महिना सर्व गँगस्टर थांबले होते आणि संपूर्ण रेकी करण्यात आली होती. फार्म हाऊसच्या आतच सलमानला मारण्याचा प्लान आखला गेला होता. सलमानला ठार करण्याचा आदेशही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं दिला होता. पण सलमान भोवतीच्या कडक सुरक्षा व्यवस्थेनं प्लान यशस्वी होऊ शकला नाही.

सलमान खानची झाली होती रेकी
पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी रविवारी माहिती दिली होती की, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील सहावा शूटर दीपक मुंडी याने बनावट पासपोर्टच्या मदतीनं दुबईला पळून जाण्याची योजना आखली होती. मुंडीचा सहकारी कपिल पंडितने बॉलीवूड अभिनेता सलमान खानला मारण्याची रणनीती आखण्यासाठी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून अभिनेत्याचा माग काढला होता. पंजाबी गायक मूसेवालाच्या हत्येनंतर तीन महिन्यांनंतर सहावा शूटर मुंडी आणि त्याच्या दोन साथीदारांना शनिवारी पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील खरीबारी पोलीस स्टेशन क्षेत्रातील भारत-नेपाळ सीमा चौकीतून अटक करण्यात आली.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.