ylliX - Online Advertising Network

dr. Suvarna Waje डॉ सुवर्णा वाजे जळीत खून प्रकरण : हा आहे संशयित पूर्ण माहिती

शहरातील बहुचर्चित खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांना डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मारेकरीला शोधण्यास यश आहे.डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणात त्यांचे पती संदीप वाजे हेच असून नाशिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. वाजे यांच्या हत्येत त्यांच्या पतीचा समावेश असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.गेल्या (दि. २६ जानेवारी) वाडीवऱ्हे परिसरात पोलिसांना जळालेल्या अवस्थेत गाडीसह मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचा असल्याची प्राथमिक माहिती होती.dr. Suvarna Waje

Nashik: Disappeared medical officer of Nashik Municipal Corporation Dr. The mystery of Suvarna Waje’s death has been solved. A police investigation has revealed that Suvarna Waje was murdered and her husband Sandeep Waje conspired with other accomplices. Nashik Rural Police has arrested Sandeep Waje in this case and a case of murder has been registered against him at Wadiwarhe Police Station

नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे (Dr Suvarna Vaje) यांचा एका गाडीत जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या घटनेप्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. जळालेल्या गाडीत  आढळलेल्या मृतदेहाचा डीएनए अहवाल आला आहे. या अहवालानुसार, मृतदेहाचा डीएनए आणि डॉ. सुवर्णा वाजे यांचा डीएनए एकच असल्याचं निष्पन्न झाले आहे. त्यामुळे डॉ. सुवर्णा वाजे यांची हत्या केली असावी असं दिसून येत आहे.

डॉ. सुवर्णा वाजे या नाशिक महानगरपालिकेच्या सिडको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. 25 जानेवारी रोजी शहरालगत असलेल्या रायगड नगर परिसरात एका जळालेल्या कारमध्ये मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली. डॉ. सुवर्णा वाजे या बेपत्ता होत्या. त्या संदर्भात त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार सुद्धा दिली होती.

जळालेल्या गाडीचा चेसी नंबर आणि गाडी नंबर यावरुन ही गाडी डॉ. सुवर्णा वाजे यांची असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर मृतदेहाचा डीएनए तपासण्यात आला. मृतदेहाचा डीएनए आणि डॉ. सुवर्णा वाजे यांचा डीएनए एकच असल्याचं समोर आलं आहे. जळालेल्या गाडीत आढळून आलेली हाडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ते डॉ. सुवर्णा वाजे यांचेच असल्याची माहिती समोर आली आहे.

25 जानेवारी रोजी नेमकं काय घडलं होतं? डॉ सुवर्णा वाजे या गाडीतून एकट्याच गाडीतून गेल्या होत्या की त्यांच्यासोबत आणखी कोण होतं? याचाही तपास पोलीस करत आहेत. तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारेही पोलीस तपास करत आहेत. जळालेल्या गाडीत आढळेला मृतदेह हा डॉ. सुवर्णा वाजे यांचाच असल्याने हा एक घातपात असल्याचं बोललं जात आहे.

डॉ सुवर्णा वाजे या नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या. कोरोनाच्या काळात त्यांनी खूपच चांगले काम केले होते. त्यांच्या कामामुळे त्यांचं कौतुकही झालं होतं. 25 जानेवारी रोजी सुद्धा त्या कामावर होत्या. काम आटोपल्यानंतर त्या रुग्णालयातून निघाल्या होत्या.

याप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती देत वाजे यांच्या बहिणीसह रुग्णालयातील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले. माहेरच्या लोकांकडून तसेच पतीकडून माहिती घेण्यात आली. मात्र कुणालाच काहीच माहित नव्हते. पोलिसांनी शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले. अखेर या हत्येचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले. कौटुंबिक वादातून पतीनेच सुवर्णा वाजे यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. मात्र सुवर्णा वाजे आणि त्यांच्या पतीमध्ये नेमका काय वाद होता आणि त्यांच्या पतीने कसा त्यांचा काटा काढला, याबाबत अद्याप कळू शकले नाही. पोलीस याबाबत सखोल चौकशी करीत आहेत.

अपघात की घातपात?

डॉ सुवर्णा वाजे यांची कार महामार्गापासून अंदाजे 90 ते 100 फूट दूर लष्करी हद्दीजवळ जळालेल्या अवस्थेत आढळली. कारची एकंदर परिस्थिती, पतीची अंबड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार आणि रात्री 11 वाजता जळत असलेल्या कारबाबत वाडीवऱ्हे पोलिसांना माहिती मिळणे. या सर्व अनुषंगाने पोलीस सर्व शक्यता गृहीत धरून तपास केला जातो आहे.

सुवर्णा वाजे या नाशिक मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. सकाळी कामावर गेलेल्या सुवर्णा वाजे रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. याचदरम्यान जळालेल्या अवस्थेत एक कार पोलिसांना सापडली आणि त्या जळालेल्या कारमध्येच त्यांच्या जळून खाक झालेल्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.