lunar eclipse वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण; जाणून घ्या वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व

काही दिवसांनी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. 19 नोव्हेंबरच्या पहाटे हे चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. या ग्रहणाला वैज्ञानिक महत्त्व असण्यासोबतच धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्वही आहे. lunar eclipse

या महिन्यात शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण होणार आहे. शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण, चंद्र लाल या महिन्यात शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण अमेरिकन वेळेनुसार पहाटे ४ वाजून ४० मिनिटांनी दिसणार आहे. त्यावेळी आपली पृथ्वी चंद्राचा ९७ टक्के भाग व्यापेल.
त्यामुळे सूर्यप्रकाश चंद्रापर्यंत पोहोचणार नाही. या दरम्यान चंद्र पूर्णपणे लाल दिसेल. धार्मिक मान्यतांनुसार ग्रहण एक अशुभ घटना मानली जाते. या काळात शुभ कार्य करण्यास मनाई आहे. ग्रहणकाळात पूजा वगैरे करणेही निषिद्ध आहे. ग्रहण काळात मंदिराचे दरवाजे बंद असतात. सहसा, सूर्यप्रकाश चंद्राच्या पांढऱ्या-तपकिरी पृष्ठभागावर आदळतो. म्हणूनच तो चमकतो. परंतु, चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका रेषेत येतात. यामुळे आपली पृथ्वी सूर्यप्रकाश चंद्रापर्यंत पोहोचण्यापासून रोखते.

lunar eclipse
lunar eclipse

भारतीय वेळेनुसार
19 नोव्हेंबर रोजी चंद्रग्रहण सकाळी 11:34 वाजता होईल आणि संध्याकाळी 5.33 पर्यंत राहील.

संपूर्ण भारतात दिसणार नाही ग्रहण-

19 नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार नाही. भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये- आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये काही क्षणांसाठी आंशिक चंद्रग्रहण दिसू शकते.lunar eclipse

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.