चांगली बातमी : गंगापूर धरण ५० टक्के भरले


कोरोनाच्या त्रासदायक दिवसात  एक चांगली बातमी आली आहे. निसर्गाने नाशिकच्या झोळीत पुन्हा आपले दान टाकले असून, मागीलवर्षी पेक्षा या वर्षी  जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणे भरली आहेत. या वाशी  मे महिन्याच्या शेवटी पर्यंत  धरणात  ३५ टक्के पाणीसाठा होता. तर  जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेला पाऊस आणि त्यानंतर जुलैमध्ये धरणक्षेत्रात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणात आताच ५० टक्के पाणीसाठा भरला आहे.

तर मुख्य गंगापूर धरणसमूहात गंगापूर, कश्यपी, गौतमी-गोदावरी आणि आळंदी या धरणांचा समावेश होतो. या  समूहातील एकूण पाणीसाठा ३४ टक्के इतका झाला आहे. त्यामध्ये गंगापूर धरणात ५०, कश्यपी धरणात २२, गौतमी गोदावरीत १९ टक्के पाणीसाठा सद्यस्थिती आहे. सध्या फक्त नांदुरमधमेश्वर धरण प्रकल्पातून ८०७ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सकाळपासून येथून विसर्ग सुरु केला आहे.

सोबतच जिल्ह्यातील पाण्याची तहान भागविणाऱ्या लहान-मोठ्या २४ धरण प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ३३ टक्के इतका पाणीसाठा आहे. ६५ हजार ८१८ दलघफू इतकी या प्रकल्पांमध्ये क्षमता असून, सद्यस्थितीत २१ हजार ६३८ इतका उपयुक्त जलसाठा आहे. यामध्ये जर नाशिकच्या गंगापूर धरणांत ८० टक्के पाणी साठा भरला असेल तेव्हा  धरणातील पाणी विसर्ग केला जातो आणि  याचा सरळ फायदा औरंगाबाद येथील जायकवाडीला होतो व  मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटतो. 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.