corona vaccine अमेरिकेत ‘या’ महिन्यात उपलब्ध होणार करोनावरील लस

करोना व्हायरसला रोखणारी लस विकसित करण्यासाठी अमेरिकेत युद्धपातळीवर संशोधन सुरु आहे. अमेरिकेत चार ते पाच कंपन्यांच्या लसी मानवी परीक्षणाच्या वेगवगेळया टप्प्यांवर आहेत.मॉर्डना कंपनीची लस सर्वात आघाडीवर आहे. मॉर्डनाची लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. अमेरिकेत ३० हजार नागरिकांवर मॉर्डनाच्या लसीची अंतिम फेजची चाचणी सुरु आहे.ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाच्या लसीचीही तिसऱ्या फेजची चाचणी सुरु झाल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले.मॉर्डनाची लस अन्य वयोगटाप्रमाणे वयोवृद्धांवरही प्रभावी ठरली आहे. या लसीचा डोस दिल्यानंतर वयोवृद्धामध्येही करोना व्हायरसचा खात्मा करणाऱ्या अँटीबॉडीजची निर्मिती झाल्याचे समोर आले.अमेरिकेत सहा ते सात कंपन्या करोनापासून मानवी जीवन सुरक्षित करणाऱ्या लसीची निर्मिती करत आहेत.

 

रशियाप्रमाणे अमेरिकेने अजून कुठल्याही लसीच्या वापराला अंतिम मंजुरी दिलेली नाही. र्षअखेरपर्यंत करोनावरील लस बाजारात आणण्याचे अमेरिकेने लक्ष्य ठेवले होते. त्यात अमेरिकेला यश येईल असे चित्र आहे.अमेरिकन जनतेसाठी दिलासा देणारी एक मोठी बातमी आहे. अमेरिकेने राज्यांना एक नोव्हेंबरपासून लस वितरणासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. एएफपीने हे वृत्त दिले आहे.डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेतील राज्यांना राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या मतदानाच्या दोन दिवस आधी म्हणजे एक नोव्हेंबरला लस वितरणासाठी तयार राहा असे सांगितले आहे. अमेरिकेत तीन नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान होईल.मॉर्डना पाठोपाठ अमेरिकेत नोव्हाव्हॅक्स लस निर्मितीमध्ये आघाडीवर आहे. नोव्हाव्हॅक्सने करोना व्हायरस विरोधात लस विकसित केली असून या लसीच्या सध्या मानवी चाचण्या सुरु आहेत. corona vaccine

कोरोना व्हायरस लसीकरणाच्या शर्यतीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आघाडीवर आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये विकसित करण्यात आलेल्या लसची चाचणी आणि तिचे निर्मिती केली जात आहे. कंपनीला लस तयार करण्यास सरकारची मान्यता मिळाली आहे. पण केवळ भविष्यातील वापरासाठी. एसआयआयची कोविशिल्ड ही लस ७३ दिवसांत बाजारात उपलब्ध होईल, असं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. पण हा केवळ एक अंदाज आहे. चाचण्या यशस्वी होतील आणि सरकारची मंजुरी मिळेल तेव्हाच ही लस बाजारात येईल, असं कंपनीचे म्हणणं आहे.

‘नेचर’ या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार ही लस माकडांवर पूर्णपणे प्रभावी ठरली. त्यांच्यात कोविड -१९ विरोधात प्रतिकारशक्ती विकसित झाली. यानंतर माणसावर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. भारत, ब्राझीलसह जगातील बर्‍याच देशांमध्ये चाचणीचा तिसरा टप्पा सुरू आहे. १७ केंद्रांवर १६०० नागरिकांवर २२ ऑगस्टपासून चाचणी सुरू झाली आहे. प्रत्येक केंद्रात सुमारे १०० स्वयंसेवक असतात. ही चाचणी नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. लसीचे परिणाम चांगले आल्यास रेग्युलेटरी अप्रूवलनंतर लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाईल. यासाठी पुढचं वर्ष उगवेल, असं सांगण्यात येतंय. corona vaccine

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.