महापालिकेची महत्वपूर्ण असलेली सिटी लिंक बससेवा काही मार्गावर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिटी लिंकने प्रवासी वाहतुकीचा वेग पकडला असतानाच आता सीएनजी तसेच पेट्रोल डिझेल दरात वाढ झाल्याने सिटिलीनक बस तोटयात येत असल्याची अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे वीस रुपये प्रति किलोमीटर उत्पन्न असलेले सिटी लिंक मार्ग बंद करण्याचा निर्णय नाशिक महानगर परिवहन महामंडळाने घेतला आहे. मात्र gas सिलेंडर , डीझेल आणि इतर महागाई सोबतच १०० रु पार होऊन देखील सामन्य माणसाला पेट्रोल परवडत आहे, कोणताही विरोध करत आहे असे दिसत नाही, त्यामुळे मनपाने घेतलेल्या या निर्णयां बाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. city link bus nashik
नाशिक महापालिकेने सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळावी यासाठी सिटिलीनक बससेवा सुरु केली. सुरवातीला 50 बसेसने झालेली सुरवात आजपर्यत 65 मार्गांवर सुरु झाली. अल्पावधीत या सेवेला नाशिककरांचा भरघोस प्रतिसादही मिळाला. शहर बससेवेबरोबर ग्रामीण भागातही बससेवा सुरु झाली. मात्र अलीकडे इंधनाच्या दरात झालेली वाढ, त्याचबरोबर काही मार्गावर मिळणारे अत्यल्प उत्पन्न यामुळे काही मार्गावरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे<p>दरम्यान नाशिक शहरासह ग्रामीण भागातील 65 मार्गांवर सुरु असून सर्वच मार्गावरील सेवा तोट्यात आहे. बससेवेसाठी होणाऱ्या तोट्याची भरपाई नाशिक महापालिका करत असते. सध्या या सेवेला सुमारे तीस कोटींचा फटका बसला आहे. त्यातच सीएनजी दरातदेखील वाढ झालेली आहे. त्यामुळे आता अतिरिक्त तोटा वाढविण्यापेक्षा ज्या मार्गांवर गेल्या तीन महिन्यापासून २० रुपये प्रति किंलोमीटर उत्पन्न नाही अशा सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला आहे.
नाशिक महानगरपालिकेने सिटीलींक ही बससेवा सुरू केल्यानंतर पहिल्या दिवसापासून बस सेवा तोट्यात आहे. 8 जुलै 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत जवळपास तीस कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. पहिल्या टप्यात 50 बसेस सुरू केल्यानंतर सद्यस्थितीत 50 मार्गावर 205 बसेस धावत आहेत. तर दैनंदिन प्रवाशांची संख्याही 65 हजारांवर पोहचली आहे. मात्र, अद्यापही अनेक मार्गावरील बसेस कमी क्षमतेने धावत असल्यामुळे तोटा वाढत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे
नवीन बसेस नकोचनवीन बस सुरू झाली की प्रति दिन किमान दोनशे किलोमीटर याप्रमाणे प्रवासी मिळो ना मिळो सिटीलींककडून ठेकेदाराला भाडे सुरू असते. त्यामुळे आधीच तोट्यात असल्याने आता नवीन बसेस न वाढवण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे आता 43 नवीन बसेसचा मार्ग बंद झाला आहे. एवढेच नव्हे तर आयुक्त पवार यांनी 20 रुपये प्रति कमी उत्पन्न असलेले मार्गावरील बसेस बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत.
नाशिक महापालिकेची महत्वपूर्ण असलेली सिटी लिंक बससेवा तोट्यात आल्याने काही मार्गावर बंद करण्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला आहे.”,
,नाशिक, नाशिक महापालिका, सिटी लिंक बससेवा”,
city link bus nashik