Shri Sadguru nashik ‘माती वाचवा’(सेव्ह सॉईल) ही मोहीम श्री. सद्गुरु 11 जूनला नाशिकला

नाशिक : मातीचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी ईशा फांउडेशनचे संस्थापक श्री. सद्गुरु अर्थात जग्गी वासुदेव यांनी जगभर ‘माती वाचवा’(सेव्ह सॉईल) ही मोहीम हाती घेतली आहे. त्या मोहिमेतंर्गत ते 11 जून रोजी नाशिकला येत आहेत.Shri Sadguru nashik

दै. देशदूत व मराठा विद्या प्रसारक समाज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सदरचा कार्यक्रम दुपारी 4.30 वाजता के.टी.एच.एम. महाविद्यालय प्रांगणात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, अ‍ॅग्री रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड, चंदूकाका सराफ अ‍ॅण्ड सन्स प्रा.लि. हे प्रायोजक असून रेडीओ विश्वास रेडीओ पार्टनर आहेत.प्रगतीची शिखरे गाठताना मनुष्याने स्वत:च्या स्वार्थासाठी पर्यावरणाची अपरिमित हानी केली. याच प्रदूषणामुळे मनुष्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यात माती प्रदूषणाचा देखील समावेश आहे.

‘माती वाचवा’ या मोहिमेतंर्गत  श्री. सद्गुरु यांनी 100 दिवसात 27  देशांना भेटी दिल्या आहेत. ही त्यांची सोलो बाईक राईड आहे. 26 देशांना भेट देऊन त्यांचे नुकतेच भारतात जामनगर येथे आगमन झाले. भारतातील विविध राज्यांत भेट दिल्यानंतर ते 11 जून 2022 रोजी नाशिकमध्ये येत आहेत. या मोहिमेत श्री.सद्गुरु यांनी 30,000 कि.मी. चा प्रवास केला. या दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या देशांना भेटी देऊन ‘माती वाचवा’ हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला आहे. 21 मार्चला लंडनमध्ये सुरु झालेली ही यात्रा जून अखेरीस कावेरी नदीच्या खोर्‍यात संपणार आहे.  ही मोहिम जागतिक अन्न संघटना आणि युनायटेड नेशन्स कनवेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन यांच्या माध्यमातून होत आहे.  2050 सालापर्यंत जगभरातील सुमारे 90 टक्के मातीचा र्‍हास होण्याचा अंदाज संबंधित संस्थेच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.  माती नष्ट झाल्यामुळे जगभरात अभूतपूर्व पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक आपत्ती संभवतात.

तीव्र स्वरुपाचे हवामान बदल, अन्न आणि पाण्याची जागतिक टंचाई, भीषण नागरी संघर्ष आणि प्रत्येक राष्ट्राची सुरक्षा आणि सांस्कृतिक रचना धोक्यात आणणार्‍या स्थलांतराचा त्या परिणामात समावेश आहे. मातीचे संवर्धन केले तर हे प्रश्न सुटणार आहेत. त्यासाठी ‘माती वाचवा’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. ‘माती वाचवा’ मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट जगातील सर्व राष्ट्रांना तातडीच्या धोरणात्मक सुधारणांद्वारे शेतजमिनीत किमान 3-6 टक्के सेंद्रिय सामग्री अनिवार्य करण्यासाठी प्रेरित करणे आहे. या किमान सेंद्रिय सामग्रीशिवाय माती नामशेष होण्याचा इशारा मृदा शास्त्रज्ञांनी दिला आहे. भारतात, शेतमातीच्या वरच्या थरात सेंद्रिय सामग्री सरासरी 0.68 टक्के असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे देशाला वाळवंटीकरण आणि माती नष्ट होण्याचा मोठा धोका आहे.

देशातील सुमारे 30 टक्के  सुपीक माती आधीच नापीक बनली आहे. जागतिक स्तरावर सुमारे 25 टक्के  सुपीक जमीन ओसाड झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्याच्या मातीच्या र्‍हासाच्या दरानुसार 2050 पर्यंत पृथ्वीचा 90 टक्के भाग वाळवंटात बदलू शकतो असा इशारा युनायटेड नेशन्सने दिला आहे. माती वाचवा, ही माती आणि धरती वाचविण्यासाठी एक सजग दृष्टीकोनाची प्रेरणा देणारी जागतिक चळवळ आहे.

जगातील 3.5 अब्ज लोकांचा पाठींबा मिळवून (जगात मतदानाचा अधिकार असणार्‍या 60 टक्के  लोकसंख्येपेक्षा जास्त) जगभरातल्या शासनांना मातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि मातीचा र्‍हास थांबवण्यासाठी धोरणात्मक बदल करण्यासाठी प्रेरित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.  जागतिक नेते, प्रभावशाली व्यक्ती, कलाकार, शेतकरी, तज्ञ, आध्यात्मिक नेते, सामाजिक संस्था आणि सामान्य जनता, माती सोबत मानवतेचा संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी या मोहिमेला पाठींबा देत आहेत.http://savesoil.deshdoot.live/श्री सद्गुरुंच्या कार्यक्रमासाठी या लिंकला क्लिक करून मिळवा मोफत प्रवेश मिळवता येईल.

Shri Sadguru nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.