नोटबंदी मुळे देशाचे आणि गरीब जनतेचे मोठे नुकसान – कन्हया कुमार

नोट बंदी ने फक्त मुकेश अंबानी आणि इतर मोठ्या व्यापारीवर्गाला पैसा उपलब्ध करवून दिला आहे. त्यामुळे अंबानी पुन्हा एकदा देशातील श्रीमंत व्यक्ती बनले आहे. ज्या माणसाच्या पाठीवर देशाचा पंतप्रधान हात ठेवतो त्याचाच विकास तर होणारच आणि तसे होताना दिसत आहे. मला फक्त नोट बंदी काळात जे बँक कर्मचारी आणि नागरिक प्राणाला मुकले आहेत त्यांच्या सोबत माझी सहवेदना आहे. मात्र नोटबंदीने देशाचे फार मोठे नुकसान केले आहे असे मत कन्हया कुमार याने व्यक्त केले आहे.

संविधान जागर सभेनिमित्ताने नाशिक येथील मुंबई नाका परिसरात पुरोगामी, परिवर्तनवादी, आंबेडकरवादी विद्यार्थी युवक संघटनांच्या वतीने दिल्लीतील जेएनयूएसयूचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांची सभा ठेवण्यात आली आहे. या सभेत कन्हैयाने पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

 मोठ्या व्यापरी वर्गाला बेल आऊदिले गेले त्यांना कर्जमाफी दिली मात्र आपल्या देशातील शेतकरीवर्ग जो खर काम करतोय या देशाचे पोट भरतोय त्याला मात्र कर्जमाफी दिली गेली नाही. त्यामुळे असे दिसतय की वोट तुम्हारा काम उनका, आपने जीतवा दिया और काम उनेक होरहे है अस मत कन्हया ने व्यक्त केले आहे.

आपल्या देशात लोकशाही कमकुवत आहे हे मान्य आहे मात्र आमचे युद्ध हे वैचारिक आहे, आम्हाला भाजपाचे प्रमाणपत्र नको आहे. या देशात सध्या सत्य बोलणाऱ्याविरुद्ध देशद्रोहाचा आरोप लावला जातो आहे. तुरुंगात टाकले जाते नजर ठेवली जाते असे प्रकार सुरु आहेत असे मत  कन्हैय्या कुमार याने व्यक्त केले आहे.

आपल्या देशातील पोलिस हे चागले आहेत मात्र शासनकर्ते त्याचा फायदा घेतात, पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला पोलीस नव्हे तर व्यवस्था जबाबदार आहे, हा गोळा होत असेलल्या पैशांचा व्यवहार वरपर्यंत चालतो त्यामुळे भ्रष्टाचार वाढतो आहे. पोलिसांना संघटना बनविण्यासाठी अधिकार का देत नाही ?- असे  कन्हैय्या कुमार याने मत व्यक्त केले आहे.

आपल्यादेशातील  वर्तमान विसरण्यासाठी इतिहास उकरून काढला जात आहे. मात्र घाबरण्याचे काम नाही आपल्या देशात जय भीम आणि लाल सलाम यांची एकता ही सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आहे.माझे मोदी यांच्यासोबत माझे वैचारिक मतभेद, मतभेद आणि शत्रुत्व यामध्ये फरक आहे. जर आपल्या देशात नोटाबंदीविरुद्ध आवाज उठविणारे जर चोर असतील, तर पळालेला  विजय माल्या कोण आहे? असा प्रश्न  कन्हैय्या कुमार याने उपस्थित केला आहे.

हा देश गरीबांचा आहे. हा देश शेतकरी वर्गाचा आहे. या देशात लोकशाही आहे. मात्र भारत एक राज्यांचा संघ आहे, म्हणजे भागवतचा संघ नाही असे म्हणत  कन्हैय्या कुमारने संघावर पुन्हा टीका केली आहे.

खर काय हे बोलण्याची हिम्मत झाली पाहिजे. आपल्या देशातील जनतेला मूर्ख समजू नका, तुम्ही जर इतिहास विसरला तर इतिहासातून तुम्हीं सुद्धा गायब होतान. आपल्या देशातील गरबी जनते सोबत मार्क्सवाद आणि आंबेकर विचार आहेत. याच विचारांनी या जनतेला टाकत दिली आहे. त्यामुळे जनता तुम्हा कधीच माफ करणार नाही. जे टीव्हीच्या सेटवर बसतात त्यांना माझे एकच म्हणणे आहे.तुम्हीं तुमच्या ठिकाणी बसून रहा आम्हाला शिकवू नका फेसबुक वर लिहिले तर आमच्यवर कारवाई भाजपा ने एक लक्षात घेतले पाहिजे तुम्ही न्यायालय नाहीत त्यामुळे आम्हाला देश प्रेमाचे प्रमाणपत्र बिलकुल देवू नका असे कन्हया कुमार म्हटला आहे.

महत्वाचे मुद्दे

  • ३ लाख कोटी काळापैसा परत आला तर मग जपानकडून कर्ज का?
  • भक्ती भगवानाची केली जाते सैतानाची नाही
  • ९ हजार कोटींचे काळे धन दोन हजारच्या नोटेने गुलाबी केले
  • डिग्री लपवायला मी मोदी नाही
  • देशद्रोहाचा आरोप करतात तर सरकार चार्जशीट का फाईल करत नाही
  • व्यवस्थेवर आरोप करणं सोपे पण व्यवस्था बदलणे अवघड
  • सर्व भ्रष्टाचारी लोक भाजपमध्ये
  • गेल्या ३ वर्षांत १९ वेळा गॅसचे दर वाढवले
  • जेव्हा कंटाळा येईल तेव्हा मोदींचे भाषण ऐका
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.