ylliX - Online Advertising Network

शेतकरी संप : तणाव वाढला पिंपळगाव जलाल टोल नाक्यावर १४४ लागू

पिंपळगाव जलाल टोल नाक्यावरील तणाव वाढला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या परिसरात बुधवारी संध्याकाळी १ जून रोजी पोलिस आणि आंदोलक यांच्या मध्ये तणाव निर्माण होवून पोलिसानावर दगडफेक झाली होती.पिंपळगावला आंदोलन कर्त्यांना पळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच हवेत गोळीबार करत अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. यात बापू जाधव नावाच्या शेतकऱ्याला नळकांडी लागल्याने तो जखमी  झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर पोलिस अधिकारी सुद्धा जखमी झाले होते.त्यामुळे अजून स्थिती खराब होवू नये यासाठी १४४ लागू झाले असून २ जून दुपारी ४ पर्यंत हे लागू राहणार आहे.या कलमा अंतर्गत ५ पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी येऊ शकत नाही…..जर आले तर कलम १४४ चे  उल्लंघन समजल्या जाते आणि अटक होऊ शकते. www.nashikonweb.com

आंदोलनकर्त्या शेतकऱ्याचा मृत्यू 
शेतकरी संपामध्ये  एका शेतकऱ्याचा जीव गेला आहे. पिंपळगाव जलाल टोल नाक्यावरील किसान क्रांती मोर्चात सहभागी असलेल्या अशोक मोरे यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. त्यामुळे या  ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे. पिंपळगाव येथील जलाल टोलनाका येथे शेतकरी आणि पोलिस यांच्यात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांवर दगडफेक तर पोलिसांनी हवेत गोळीबारी करत लाठीचार्ज केला होता. हे होत असताना या तणावात अशोक मोरे यांना हृद्य विकाराचा तीव्र झटका बसला आणि त्यांचामृत्यू झाला आहे.

Kalam 144, section 144, कलम १४४ म्हणजे काय ?

येवल्यात संपाला हिंसक वळण पोलीस अधिकारी जखमी

नाशिक : नाशिक येथील शेतकरी संपाला हिंसक वळण लागले आहे.यामध्ये  येवला येथील जलाल टोल नाका येथे संपकरी शेतकरी वर्गाने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनवर दगडफेक केली आहे. यामध्ये ४ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक पोतद्दार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तर या झाड्पेत दोन शेतकरी सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे.

संप करत असलेल शेतकरी टोल नाका परिसरात वाहन अडवून तपासात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना असे करण्यास मज्जाव केला. तेव्हा हा सर्व प्रकार घडला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी दगडफेक केली असून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.त्यामुळे  पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रुधुरांचा वापर  केला आहे. तर दुसरीकडे नैताळे येथे परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी सी आर पी एफ जवानांना पाचारण केले आहे. शिवाय कलम १४४ लावण्याची पोलिसांनी तयारी केली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.