यंदाचा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर तमाशा जीवन गौरव पुरस्कार नाशिकच्या राधाबाई कारभारी खोडे नाशिककर यांना जाहीर झाला आहे. राज्याच्या सांस्कृतिक संचालनालय यांच्याकडून हा पुरस्कार देण्यात आला आहे. राधाबाई यांनी तमाशा या लोक कलेसाठी केलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. येत्या २१ मार्चला मुंबई येथे पुरस्कार वितरण केले जाणार असून पाचलाख रोख, मानचिन्ह व ,मान प्रमाणपत्र असे स्वरूप आहे.तर आय निमित्ताने २१ ते २५ मार्च कालावधीत तमाशा ढोलकी फड मोहोत्सव आयोजित केला आहे.या बाबतची माहिती सांस्कृतिक संचालनालय दिली आहे.