ylliX - Online Advertising Network

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होणार नाही याची दक्षता घ्या- छगन भुजबळ  

नाशिक,दि.२४ ऑगस्ट :- नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत असून पिक कर्ज न मिळाल्याने नुकतीच बागलाण तालुक्यात तरुण व अपंग शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. ही घटना हृदयद्रावक असून नाशिक जिल्ह्यात पुन्हा पिक कर्जावाचून शेतकरी आत्महत्या होणार नाही यांची दक्षता घ्यावी अशी सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी व सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आज नाशिक जिल्ह्यातील जिल्ह्यातील टंचाई, वीजेचे प्रश्न, पिक कर्ज, वनहक्क जमिनी, रस्त्यांचे प्रश्न, जिल्ह्यातील पर्यटनाची अपूर्ण कामे, मांजरपाडा प्रकल्पासह रखडलेले सिंचनाचे व विविध प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या दालनात बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील प्रश्नांचा व विकासकामांचा आढावा घेऊन सबंधित अधिकाऱ्यांना त्या लवकर लवकर मार्गी लावाव्या अशी सूचना केली.take action farmers suicide nashik district chagan bhujbal city

यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह आमदार नरहरी झिरवाळ,जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, दिलीप खैरे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीतेनिवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता अलका वाघ, महावितरणचे अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता रणजीत हांडे, पूर्व विभागाचे उपवनसंरक्षक, अधिक्षक कृषी अधिकारी पडवळ, जिल्हा कृषी अधिकारी काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी,  कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबेसहायक कार्यकारी अभियंता महेश पाटील आदी उपस्थित होते.take action farmers suicide nashik district chagan bhujbal city

नाशिक जिल्ह्यातील प्रश्नांचा आढावा घेतांना छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक गरजू शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळाले पाहिजे यासाठी राष्ट्रीयकृत बँकांना सक्त ताकीद द्यावी असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत आढावा घेऊन नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी असलेल्यापाणी टंचाईची  माहिती घेतली. यावेळी जिल्हाधीकारी यांनी सांगितले की, आपण जूनमध्ये दिलेल्या सुचनेप्रमाणे जूननंतर सुद्धा टंचाईग्रस्त भागात टँकर सुरु ठेवण्यात आले असल्याची माहिती दिली.take action farmers suicide nashik district chagan bhujbal city

   जिल्ह्यात विजेचे प्रश्न गंभीर असून दोन दोन महिने शेतकऱ्यांना ट्रान्सफार्मर मिळत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच लोडशेडींगच्या वेळा सोडून इतर वेळेस अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित केला जातो.  मात्र लोडशेडींगच्या वेळेव्यतिरिक्त विद्युत पुरवठा खंडीत केला जावू नये अशी सूचना त्यांनी केली.  तसेच मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील वडपे ते धुळे या चौपदरी रस्त्याची दुरवस्था झाल्याने रस्त्याची सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे  तसेच एका युवकाचा रस्त्यावरील खड्यामुळे अपघात होऊन बळी गेल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्यांची देखभाल दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तर काही ठिकाणी रस्ता नसल्याने गावाला बस सुद्धा जात नसल्याचे उघडकीस आले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

त्यांनी पुढे सांगितले की,नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे हाती घेतांना पी.सी.आय नुसार प्राधान्यक्रम विचारात घेऊन त्यानुसार मंजुरी देण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत. मात्र सन २००१-२१ च्या रस्ते विकास आराखडा (पी.सी.आय) तयार करतांना महत्वाच्या रस्त्यांचा समावेश झालेला नाही. या पीसीआयच्या आराखड्यातील अनेक त्रुटींमुळे काही गटांमध्ये महत्वाच्या रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असतांना देखील सदर रस्त्यांचा या आराखड्यात समावेश नसल्यामुळे या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळणार नाही. तरी पीसीआय आराखड्यात समाविष्ट नसलेल्या कामांची वस्तुस्थितीदर्शक व स्थानिक निकड लक्षात घेऊन रस्त्यांची कामे हाती घेण्याची गरज असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.take action farmers suicide nashik district chagan bhujbal city

जिल्ह्यातील मांजरपाडा प्रकल्प, पुणेगाव दरसवाडी डावा कालवा, साठवण बंधारे, पाणी पुरवठा योजना यांचा आढावा घेऊन सदर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी मांजरपाडा बोगदा जानेवारी महिन्यांपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती सबंधित अधिकाऱ्यांनी दिली. नाशिक शहरातील कलाग्राम, बोट क्लब, ग्रेप पार्क रिसोर्ट, साहसी क्रीडा संकुल यासारखे अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहे काही प्रकल्पांचे किरकोळ कामे बाकी आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही. याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत नाशिकच्या बोट क्लबसाठी अमेरिकेतून मागविलेल्या ४८ बोटी कुठे गेल्या अशा सवाल करून बोटी चोरीला गेल्या असतील तर गुन्हे दाखल करा अशा कडक शब्दात अधिकाऱ्यांना सुनावले. यावेळी अधिकारी देखील निरुत्तर झाल्याचे बघावयास मिळाले.  यावर नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकल्पांची पाहणी करून लवकरच हे प्रकल्प सुरु करण्यात येतील असे आश्वासन दिले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील आदिवासी नागरिक व इतर पारंपारिक नागरिकांना वनहक्क कायद्याअंतर्गत  वन  जमीनी  मिळणेबाबत अनेक  प्रकरणे प्रलंबीत आहेत. वनजमिनी दाव्याबाबत प्रलंबित प्रकरणांची सद्यस्थिती काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की जिल्ह्यात १९ हजार वनहक्क प्रकरणांपैकी १५ हजार प्रकरणे मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत. सदर अडचणींवर मार्ग काढण्यासाठी तालुका स्तरावर कॅम्प घेण्याबाबत आ.नरहरी झिरवाळ यांनी केलेली सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली. आणि लवकरात लवकर वनहक्क प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

त्याचबरोबर जिल्हा परिषद नाशिक यांचेकडील कडील प्रलंबित येवला तालुक्यातील राजापूरसह ४१ गावांच्या नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात सामावेश केल्यामुळे जिल्हास्तरीय यंत्रणांनी करावयाची कार्यवाही,  विंचूर लासलगांवसह १६ गांवे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे भूमिगत पाईप बदलणे, लासलगांव-विंचूरसह १६ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना‘ आणियेवला ३८ गांवे प्रादेशिक  पाणीपुरवठा योजना‘ या दोन्ही योजनांसाठी राज्यातील पायलट प्रोजेक्ट म्हणून नाविन्यपूर्ण योजनेमधून सौरउर्जेचे प्रकल्प करण्याबाबत विधीमंडळात निर्णय झाल्याने याबाबत झालेली कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.take action farmers suicide nashik district chagan bhujbal city

नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र  कार्यान्वित करण्यासाठी मंजूर पदांच्या आकृतीबंधाप्रमाणे पदे भरणे, शिक्षकांची रिक्त पदे इत्यादीबाबत भुजबळांनी सूचना केल्या. त्याचबरोबर दारिद्र्यरेषेखालील वंचित लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळणे, कोटमगांव (देवीचे),ता.येवला येथील क वर्ग यात्रास्थळांचा ब वर्गात समावेश करणे, श्री.लोणजाई माता मंदिर,सुभाषनगर,ता.निफाड (ब वर्ग तीर्थक्षेत्र) येथील विकासकामांचे प्रस्ताव. इगतपुरी (जि.नाशिक) तालुक्यातील भाम धरणग्रस्तांच्या अडचणीं, तसेच केळझर (ता.बागलाण) धरणातील चारी क्र.८ चे उर्वरीत काम, हरणबारीचे पाणी ढोलबारे येथे सोडण्यात यावे व जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेऊन सदर विकास कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे अशी सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी या सर्व बाबींचा सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित कामाबातत सबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच यासर्व प्रश्नांमध्ये आपण स्वतः लक्ष घालून ते मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिले.

take action farmers suicide nashik district chagan bhujbal city
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.