ylliX - Online Advertising Network

नाशिकमध्ये सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी

सावरकर प्रेमींची ​भगूरला भेट, ‘अभिनव भारत’ मध्येही विशेष कार्यक्रम    

नाशिक : नाशिक शहरालगत असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर  यांच्या भगूर या मूळ गावी १३५ व्या जयंती निमित्ताने शेकडो सावरकर प्रेमींनी भेट दिली. यावेळी सावरकर वाड्यात त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. वाड्यातील त्यांच्या जन्मस्थळी भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीने शासकीय महापूजा करण्यात आली. याप्रसंगी स्वा.सावरकरांचे नातू रणजित सावरकर, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सावरकरांना संगीतमय अभिवादन करण्यात आले. मुंबई येथील आहारतज्ज्ञ डॉ. किरण वाटारे यांचे आहार विषयावर व्याख्यान तर चैताली म्युझिकल हार्मोनी मुंबई गायक मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतील  ‘जल्लोष २०१८ ‘ या कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी स्वा.सावरकर फेसबुक समूह व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भगूर दर्शन मोहिमेत पर्यटकांनी सहभाग नोंदविला.यामध्ये मुंबई,पुणे,नाशिक सह अन्य जिल्ह्यांमधून आलेल्या पर्यटकांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक,पुरातन लक्ष्मी नारायण मंदिर, धोपावकर वाडा, सावरकर बंधुंनी प्राथमिक शिक्षण घेतलेली शाळा, पुरातन खंडोबा मंदिर, पुरातन राम मंदिर, पुरातन शितळा देवी मंदिर, भृगुऋषी आश्रम, दारणा नदी तीर, पुरातन शिव मंदिर,  स्वा.सावरकर अभ्यासिका आदी ठिकाणचे दर्शन घडविण्यात आले.

दूसरीकडे नाशिक शहरात असलेल्या सावकर यांनी स्थापन केलेल्या ‘अभिनव भारत’ कार्यालयातही सावरकर यांच्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रम झाला. यावेळी अभिनव भारतचे विश्वास्त सूर्यकांत रहाळकर, नगरसेवक शाहू खैरे आदींच्या उपस्थितीत सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बासरी कलावंत महाजन यांनी जयोस्तुते हे गीत बासरी वाजवले. अभिवादनानंतर उपस्थितांना सावरकरांच्या आवाजातील ध्वनीमुद्रिका ऐकविण्यात आली. सावरकरांच्या जीवन कार्यावर आधारीत वेगवेगळ्या चित्रफिती संकलित करत त्यांचे विज्ञान, राष्ट्रभक्ती विषयक विचार पुन्हा एकदा नव्या पिढीसमोर चित्रफिती रूपात आणले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.