ylliX - Online Advertising Network

सुविचार गौरव पुरस्कार जाहीर अभिनेते स्वप्निल जोशी, अभिजित खांडकेकर यांचा समावेश

नाशिक समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणाऱ्या मान्यवरांची “सुविचार गौरव” पुरस्कारासाठी नावे जाहीर करण्यात आली असून यात अभिनेते स्वप्नील जोशी व अभिजित खांडकेकर यांचा समावेश आहे.विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिंचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा गौरव करण्यासाठी ‘सुविचार मंच’ या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रस्ताव मागविण्यात आले होते. या प्रस्तावांमधून सुविचार गौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींची नावे संस्थेच्या वतीने आज जाहीर करण्यात आली.suvichar gaurav award nashik 2018 swapnil joshi abhijit kahdkekar

 यामध्ये कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेते स्वप्निल जोशी यांची निवड करण्यात आली. तर अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल “माझ्या नवऱ्याची बायको” फेम अभिनेते गुरु उर्फ अभिजित खांडकेकर यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यांसह डॉ.रविंद्र सपकाळ (शैक्षणिक), दिपक बागड (उद्योग), हृदयरोग तज्ञ डॉ. आशुतोष साहु (वैद्यकीय), विश्वास ठाकूर (सामाजिक), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडु माया सोनवणे (क्रीडा), जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.विनोद गोरवाडकर (साहित्य) यांना सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांना यावेळी “जीवन गौरव” पुरस्काराने गौरवित करण्यात येणार आहेत.suvichar gaurav award nashik 2018 swapnil joshi abhijit kahdkekar

सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांचे अध्यक्षतेखाली आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्निल तोरणे व के.बी.एच.आय.एम.आर. या व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक प्रा.डॉ. प्रशांत सूर्यवंशी हे सदस्य असलेल्या निवड समितीने आलेल्या प्रस्तावांमधून सर्वोत्तम गौरवपात्र व्यक्तिंची निवड केली आहे. suvichar gaurav award nashik 2018 swapnil joshi abhijit kahdkekar

सोमवार दि. १३ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५ वाजता माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ व माजी मंत्री विनायकदादा पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुविचार मंचचे अध्यक्ष अॅड. अशोक खुटाडे व सचिव अॅड. रविंद्र पगार यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी संयोजक आकाश पगार मोबा. ९४२१५६३५५५ व विशाल गांगुर्डे मोबा. ७५८८१९४६१५ यांच्याशी अथवा गाळा नं. एफ-१०, नानाजी शेटे बिझीनेस सेंटर, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे संपर्क साधण्याचे आवाहन सुविचार मंचच्या वतीने प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या पत्रकात करण्यात आले आहे.  suvichar gaurav award nashik 2018 swapnil joshi abhijit kahdkekar

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.