ylliX - Online Advertising Network

लासलगाव, येवला बाजारसमितीत कांदा प्रक्रिया उद्योगासाठी विशेष अर्थसहाय्य द्या: भुजबळ

मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे मागणी

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील लासलगाव व येवला येथील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमार्फत कांद्यांवर प्रक्रिया करून उपउत्पादने तयार करणारे प्रक्रिया उद्योग निर्माण करण्यासाठी विशेष आर्थिक सहाय्य देण्यात यावे अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे लेखी पत्रान्वये केली आहे. support financially onion processing unit lasalgaon yeola apmc bhujbal

छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशातील कांदा पिकाच्या ६० टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. तर राज्यातील एकूण उत्पादनाच्या ६० टक्के उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात होते. माझ्या मतदारसंघात कांदा हे प्रमुख पिक असून येथील लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समिती ही बाजार समिती कांद्याबाबत आशिया खंडातील नंबर एकची बाजार समिती आहे. कांदा पिक हे शेतकऱ्याचे जिव्हाळ्याचे पिक असल्याने कांद्याच्या भावाचे नेहमी राजकारण होत असते. जेव्हा या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात यायला लागते, तेव्हा भाव गडगडतात अशावेळी शेतकऱ्याना कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते व शेतकरी देशोधडीला लागला जातो. त्यांचा उत्पादन खर्च सुद्धा वसूल होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून कांद्यावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे उपउत्पादने करणारे प्रक्रिया उद्योग निर्माण करणे आवश्यक आहे. युरोप, अमेरिका इ. पाश्चिमात्य देशात कांदा पावडर, कांदा पेस्ट ओनिअन ऑईल, ओनिअन कॉन्स्नट्रेट चा वापर केला जातो. आपल्याकडे ही उपउत्पादने तयार करून ते परदेशात निर्यात केली जावू शकतात, त्याद्वारे कांद्याला योग्य मुल्य मिळुन कांदा भावाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो असे त्यांनी म्हटले आहे.

कांद्यावर प्रक्रिया करून निर्यातक्षम उपउत्पादने बनविली जावू शकतात मात्र नाशिक जिल्ह्यात एकही कांदा प्रक्रिया प्रकल्प नाही. कांद्याच्या मध्यम आकाराच्या प्रकल्पामध्ये वर्षाला ६.४ मिलिअन किग्रॅ कांद्याचे एक वर्षाला प्रोसेसिंग करता येते. कांद्यावरील निर्जलीकरण प्रक्रियेनंतर लार्ज चॉप्ड डिहायड्रेटेड ओनिअन, स्मॉल चॉप्ड डिहायड्रेटेड ओनिअन, स्टॅडर्ड चॉप्ड डिहायड्रेटेड ओनिअन, मिक्स्ड चॉप्ड डिहायड्रेटेड ओनिअन,ग्रॅन्युलेटेड स्टॅडर्ड पावडर,किबलड पेस्ट याव्यतिरिक्त कांद्यापासून कांदा ऑईल,कांदा कॉन्स्नट्रेट तसेच व्हिटॅमीन बी, व्हिटॅमीन सी,आयर्न व कॅल्शिअम ही उपउत्पादने तयार करून देश विदेशात निर्यात करता येवू शकतात. यासाठी शासनाने या प्रक्रिया उद्योगांसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या, शेतकरी सहकारी संस्था किंवा प्रक्रिया उद्योग संस्थांना विशेष आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे.

support financially onion processing unit lasalgaon yeola apmc bhujbal
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.