नाशिक : रम्य ते बालपण आणि शाळा, आपण नेहमी शाळेच्या आठवणीत हरवून जातो, तर अनेकदा शाळेतील मित्र मैत्रिणी एकत्र येत पुन्हा जुन्या आठवणीना उजाळा देतात. शाळेतील शिक्षक भेटले तर गहिवरून येते. मात्र शाळेत शिकवत असलेल्या शिक्षकाला जर विद्यार्थी वर्गाने जाऊच दिले नाही तर? students crying zp school transfered teacher leave villagers igatpuri nashik
असाच प्रकार इगतपुरी येथे घडला आहे. शिक्षकाला निरोप देतांना पूर्ण गाव भावनिक झाले तर अनेकांना अश्रू अनावर झाले. विद्यार्थी आणि गावातील नागरिक भावनिक होवून शिक्षकाला निरोप देतायत त्यांचा हा व्हिडियो व्हायरल झाला आहे.
इथे बघा व्हिडीओ :
इगतपुरी येथील पांगुळ गव्हाण या गावातील जिल्हा परिषदेतील शिक्षक वैभव गगे यांची बदली झाली आहे. त्यांना निरोप देण्यासाठी गावातील नागरिकांनी शनिवारी निरोप समारंभ आयोजित केला होता. students crying zp school transfered teacher leave villagers igatpuri nashik
या कार्यक्रमात संपूर्ण गाव शाळेच्या आवारात जमा झाले आहे. या निरोप समारंभाला एकत्र आलेल्या लहान मुलांपासून, वयोवृद्धाना यावेळी अश्रू अनावर झाले.
वैभव गगे सर गावातील ज्येष्ठ मंडळीचे पाया पड़त आशीर्वाद घेत होते. लहान मुलांना गळा भेट आणि दिलासा देत होते. विद्यार्थ्यानी शाळेची प्रार्थना म्हणत रडत रडत त्यांना निरोप दिला आहे. students crying zp school transfered teacher leave villagers igatpuri nashik
वैभव गगे जिल्हा परिषदेच्या शाळेतील मूळचे शहापुर तालुक्यातील रहिवासी आहेत. वैभव गगे 21 जून 2007 साली या शाळेत रुजू झाले होते. पहिले ते पाचवी इयत्तेच्या मुलांचे ते वर्गशिक्षक होते. ते मनमिळावू होते आणि मुलांना न मारणे, समजावून घेत प्रेमाने शिकवणे यामुळे ते फार लोकप्रिय झाले होते.
सोबतच ते मुलांना संगणकाची विशेष शिकवणी देत, शाळेच्या डीजिटायझेशनमध्येही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे शिक्षकाची 15जून रोजी बदली होणार हे कळताच संपूर्ण गाव भावूक झाले होते. त्याचवेळी गावातील पालक आणि विद्यार्थी भेट घेत आहेत. तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते हे सर्व कोणीतरी मोबाईल मध्ये शूट केले होते, हीच क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.