विजेचा धक्का बसल्याने विद्यार्थी मृत्यू

सटाणा- विजेच्या धक्का बसल्याने  अठरा वर्षीय आणि  १२ वी वर्गात शिकत असलेल्या  विद्यार्थी मृत पावला आहे. तर ही  दुर्दैवी घटना सटाणा तालुक्यातील पिंपळदर येथे  सकाळी ७ वाजता घडली आहे.विकी बापू मोहाटकर (वय १८) हा युवक त्याच्या भावासोबत  सकाळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेला .शेतातील ट्रान्सफार्मर काही दिवसांपासून जळालेले असल्याने दोन्ही बंधू दुसऱ्या ट्रान्सफार्मर मधून  तात्पुरते वीज कनेक्शन घेणार होते. दरम्यान मोठाइतर कामात असल्याने  विकी मोहाटकर ट्रान्सफार्मर मधून  वीज कनेक्शन घेत होता. याचवेळी  त्याला विजेचा तीव्र धक्का बसला आणि तो जागेवरच कोसळला.मोठा भाऊ तेथे आल्यावर हा प्रकार लक्षात आला.मात्र तोपर्यंत विकि मृत झाला  होती.त्याचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. मयत विकी मोहाटकर हा सटाणा महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होता.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.