ylliX - Online Advertising Network

कामाचा ताण : मनपा सहायक अधिक्षकाची राहत्या घरी आत्महत्या

नाशिक : नाशिक महापालिकेच्या राजीव गांधी मुख्यालयातील घरपट्टी-पाणीपट्टी विभागातील सहायक अधिक्षक संजय दादा धारणकर (४७) यांनी गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवरजवळील ऋषिकेश टॉवरमध्ये राहत्या घरी  गळफास घेऊन आत्महत्त्या केली आहे.त्यांच्या आत्महत्त्येमागील निश्चित कारण स्पष्ट समोर आले नाही. घरामध्ये तोल जाऊन पडल्याने त्यांना काही प्रमाणात दुखापत झाली होती. धारणकर हे मागील काही दिवसांपासून रजेवर होते.

सहायक अधिक्षक संजय दादा धारणकर

बुधवारी दि.१ नोकरीवर रुजू झाले होते. त्यांनी गुरूवारी (दि.२) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास धारणकर यांनी गळफास घेत राहत्या घरी आत्महत्त्या केली असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले तेव्हा वैद्यकिय अधिकारी यांनी तपासून मृत  घोषित केले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण असा परिवार आहे.

‘मी माझ्या कामाच्या तणावामुळे आत्महत्त्या करत आहे. मुलांकडे लक्ष द्यावे’ असा मजकुर असलेली चिठ्ठी जिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना आढळून आली आहे. मात्र चिठ्ठीची तपासणी पोलिस करत असून त्यातील अक्षर आणि इतर बाबी तपासल्या जात आहेत.

धारणकर अनुकंपावर महापालिकेच्या सेवेत भरती झाले. त्यांनी सुमारे २२ वर्षे सेवा केली आहे. त्यांच्या अचानकपणे झालेल्या निधनाने संपुर्ण महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये धक्का बसला असून सर्वात  हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाºयांनी पंचनामा केला असून घटनेची नोंद केली आहे.

नाशिकच्या बातम्या हव्या आहेत मग आमच्या whats aap ग्रुपमध्ये सामील व्हा : कोणतेही फालतू मेसेज नकोत, कोणतेही समाजविरोधी धर्म विरोधी मेसेज नको, कोणाही व्यक्ती समूह विरोधात पोस्ट नको. ग्रुप चालकावर सर्व अधिकार असून ग्रुप मध्ये ठेवणे,  न ठेवणे ग्रुप चालक ठरवतील. ग्रुपमध्ये महिला आणि पोलीस देखील आहेत त्यामुळे वागणूक योग्य असू द्या ! धन्यवाद

ग्रुपची लिंक : https://chat.whatsapp.com/8Y4rF0ioa954F7uoqTrh3H

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.