State restrictions राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत; नव्या नियमांचा प्रस्ताव

कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत.State restrictions have not been lifted; Proposal of new rules

‘ब्रेक दि चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे, या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील.State restrictions

निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून  याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.

——————————————————————–

सर्व शिक्षा अभियान’ या नावाने शासनाची कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही – शिक्षण परिषदेचा खुलासा
फेक वेबसाईटबाबत खुलासामुंबई, दि. ३ : सर्व शिक्षा अभियानासोबत नाम साध्यर्म असणारे http://shikshaabhiyan.org.in/index.php या संकेतस्थळाचा तसेच या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचा राज्य शासनाशी तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयाशी, समग्र शिक्षा योजनेशी कोणताही संबंध नाही, असा खुलासा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी यांनी एका पत्राद्वारे केला आहे. यासंदर्भात संभ्रम निर्माण करणारे वृत्त विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित झाले होते.

संबंधित (http://shikshaabhiyan.org.in/index.php) संकेतस्थळावर Sarva Shiksha Abhiyan Recruitment २०२१ या मथळ्याने Primary Teacher, Junior Teacher, Karyalaya Staff, Chaprasi या पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याचे संकेतस्थळावर दिसून येते.

प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान केंद्र पुरस्कृत योजनेची सन २००२-०३ पासून सन २०१७-१८ पर्यंत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय या विभागाच्या अधिनस्त महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत होती.

सद्य:स्थितीत सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक शिक्षण या पूर्वाश्रमीच्या केंद्र पुरस्कृत योजनांच्या एकत्रिकीकरणातून दिनांक ०१/०४/२०१८ पासून समग्र शिक्षा योजनेची अंमलबजावणी  या कार्यालयामार्फत राज्यात सुरू आहे. त्यामुळे सन २०१७-१८ (दि. ३१/०३/२०१८) नंतर सर्वशिक्षा अभियान या योजनेची वेगळ्याने अंमलबजावणी राज्यात सुरू नाही, असेही श्री.द्विवेदी यांनी या खुलाश्याद्वारे स्पष्ट केले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.