ylliX - Online Advertising Network

त्र्यंबकेश्वर तीर्थ क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकार विशेष बैठक घेणार – मुख्यमंत्री

नाशिक :नाशिक येथील  त्र्यंबकेश्वर तीर्थ क्षेत्राचा विकास करण्यासाठी राज्य सरकार लवकरच मंत्रालयात विशेष  बैठक घेणार आहे. तर जगप्रसिद्ध तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी राज्य शासन सहकार्य करनार आहे  अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे दिली आहे. श्री. संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचा जीर्णोद्धार कार्याचा शुभारंभ आणि भक्त निवासाचे उदघाटन फडणवीस यांच्या हस्ते आज  करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री गुजरात येथे गुजरात सरकारच्या शपतविधी कार्यक्रमाला हजर होते. तेथून ते नाशिकला आले होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की “या मंदिरांच्या अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी राज्य सरकार फार कटिबद्ध आहे. त्यामुळे या ठिकाणच्या विकास लवकर व्हावा म्हणून मी स्वतः मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेणार आहोत. यातून या परिसरातील मंदिरे आणि त्यांचा विकास राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे.”

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की देवाकडे आज मी प्रामाणिकपणे काम पुढे ही करता येईल अशी मागणी करतो. समाज सेवा करताना प्रामाणिक पणे कामे करता यावी आणि सर्वाना सद्बुद्दी द्यावी असी मी देवाकडे मागणी आणि प्रार्थना करत आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.