ylliX - Online Advertising Network

नाशिक : राज्य हौशी नाट्यस्पर्धेला आजपासून सुरुवात

नाशिक : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे 56 व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे  आयोजन 7 ते 24 नोव्हेंबर 2016 या कालावधीत करण्यात आले आहे.

नाट्यस्पर्धेतील नाटकांचे सादरीकरण रोज सायंकाळी 7 वाजता होणार आहे. उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देतानाच राज्यात नाट्यकलेच्या प्रचारप्रसारातून सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 7 नोव्हेंबर रोजी नाशिक येथील अक्षरा क्रिएशनच्या  चिं.त्र्य. खानोलकर लिखीत व नाना देवरे दिग्दर्शित ‘रखेली’ हे नाटक सादर होईल.  दि. 8 रोजी धुळे येथील चैतन्य बहुउद्देशीय संस्थेचे प्रभाकर दुपारे लिखीत व मार्टिन खैरनार दिग्दर्शित ‘विदूषक’, दि. 9 रोजी नाशिक येथील दीपक मंडळाचे आदिल शेख लिखीत व अमित शिंगणे दिग्दर्शित ‘मोगुल’ अशी नाटके होणार आहेत.

 दि. 10 रोजी गिरीधरलिला प्रोडक्शनचे राजेंद्र पोळ लिखीत व भगवान देवकर दिग्दर्शित ‘फ्रेंडशीप’, दि. 11 रोजी गोसावी बहुउद्देशीय संस्थेचे गिरीष जोशी लिखीत व राजेश शर्मा दिग्दर्शित ‘फायनल ड्राफ्ट’ दि. 13 रोजी नाशिक येथील एच.ए.ई.डब्लू.आर.सी. रंगशाखाचे संदेश सावंत लिखीत व दिग्दर्शित ‘मामला चोरीचा की?’, दि. 14 रोजी कवि नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाचे अमेय दक्षिणदास लिखीत व रविकांत शार्दुल दिग्दर्शित ‘ द कॉन्शस’, दि. 15 रोजी  लोकहितवादी मंडळाचे भगवान हिरे लिखीत व महेंद्र चौधरी दिग्दर्शित ‘  अनफेअर डिल’, दि. 16 रोजी धुळे येथील लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्थेचे बबन प्रभु लिखीत व मुकेश काळे दिग्दर्शित ‘ झोपी गेलेला जागा झाला’, दि. 17 रोजी नाशिक येथील मेनली ॲमॅच्युअर्सचे महेश डोकफोडे लिखीत व आदिती मोराणकर दिग्दर्शित ‘ गांधी हत्या आणि मी’ नाटक होणार आहे.

दि. 18 रोजी आर.एम. ग्रुपचे चेतन दातार लिखीत व प्रशांत हिरे दिग्दर्शित ‘ खेळ मांडियेला अर्थात अडलय माझं खेटर’, दि. 19 रोजी रंगकर्मी थिएटरर्सचे मयूर थोरात लिखीत व दिग्दर्शित ‘302 प्रश्नचिन्ह’, दि. 21 रोजी छत्रपती सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळाचे लक्ष्मण काटे लिखीत व प्रसन्न काटे दिग्दर्शित ‘वावटळ’, दि. 22 रोजी शुक्ल यजुर्वेदीय मध्यदिन ब्राम्हण संस्थेचे योगेश सोमण लिखीत व विक्रम गवांदे दिग्दर्शित ‘ केस  नं. 99’, दि. 23 रोजी विजय नाट्यचे नेताजी भोईर लिखीत व  दिग्दर्शित ‘सत्यम शिवम सुंदरम्’ आणि दि. 20 रोजी  विद्ययवासिनी बालविद्या वि.शि. संस्थेचे रोहित पगारे लिखीत व दिग्दर्शित ‘ निशस्त्र योद्धा’ ही नाटके सादर होणार आहेत. रसिक प्रेक्षकांनी नाट्यकलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावे,  असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालकांनी केले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.