विशेष सरकारी वकिलांना जीवे मारण्याची कारागृहातून धमकी; वाय प्लस दर्जाची सुरक्षा

नाशिक : नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांना धमकीचे पत्र आले आहे. या कारणाने शहर पोलिसांनी त्यांची सुरक्षा वाढवून वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. अजय मिसर हे प्रसिद्ध सरकारी वकील आहेत. ते सध्या मोक्का अंतर्गत येत असलेल्या १२ केसेस हाताळत आहेत. यामध्ये प्रामुख्याने धान्य घोटाळा, पाप्या शेख, चंदुलाल पाशा, चेतन पगारे, भारत नेपाळी, दारू कांड, पारनेर मोक्का, अबू जिंदाल, लष्कर ए-तोयबा सारख्या मोठ्या आणि गंभीर केसेस त्यांनी हाताळणी केली आहे.Special public prosecutor threatens nashik jail y-plus level security

नाशिक मध्यवर्ती कारागृहातून संशयित आरोपीने तक्रार पेटीत एक पत्र टाकले आहे. त्यानुसार  जोपर्यंत अजय मिसरकडे केस आहेत तोपर्यंत येथून आपली सुटका होणार नाही, मिसर केस खूप ताणून धरतात, त्याचा गेम केल्याशिवाय आपण इथून कधीच सुटणार नाही. अशा आशयाचे जूनला तक्रार पेटीत टाकण्यात आले आहे.Special public prosecutor threatens nashik jail y-plus level security

दर आठवड्याला तक्रार पेटी उघडली जाते. त्यानुसार हे पत्र जेल अधिकाऱ्यांना मिळाले. जेल अधिकाऱ्यांनी पत्राची गंभीर दखल घेतली असून नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्याकडे पत्र हस्तांतरित केले. अॅड. मिसर यांची सुरक्षा वाढवून वाय प्लस करण्यात आली आहे. यापुर्वीही अॅड. मिसर यांना तत्कालीन पोलीस आयुक्त जगन्नाथन यांच्या काळात दोन वर्षांपूर्वी मध्यवर्ती कारागृहातून मोक्का सेलमधून धमकी आली होती.

Special public prosecutor threatens nashik jail y-plus level security
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.