नाशिक : बॉश कंपनीचे परस्पर पार्ट तयार करत दोन कोटी रुपयांची फसवणूक घटना ताजी असताना आता नवीन चोरी उघड झाली आहे. नाशिकमधील महिंद्रा सोना आणि बॉश येथून जवळपास ११ लाख ४५ हजार रुपयांच्या स्पेअरपार्टची चोरी झाली असल्याचे उघड झाली आहे. या संधर्भात सातपूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला आहे.
नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात महिंद्रा आणि बॉश या दोन कंपन्यांची मोठी गुंतवणूक आहे. या दोघांवर अनेक इतर छोटे उद्योग अवलंबून आहे. काही दिवसा पूर्वी बॉश कंपनीचा स्पेअर पार्टचा माल परस्पर विक्री करणारी टोळी नाशिक पोलिसांनी पकडली आहे.
या नवीन प्रकरणात विजय गायकवाड यांनी सातपूर पोलिसात फिर्याद दिली असून संशयित पंकज अशोक वर्मा (चुंचाळे ), नेउळ मतीउल्ला खान यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये जानेवारी २०१० ते जानेवारी २०१८ या कालावधीत कंपनीतून पिस्टन, फ्युल इंजक्टर आदी पार्ट जवळपास १० लाख ५० हजार २२५ रुपये किंमतीचे चोरी करून बाहेर विकले आहेत. तर महिंद्रा सोना येथून ९० हजार नऊशे रुपये किंमतीचे माल त्यांनी चोरी करत बाजारत विक्री केला आहे. पोलिसांनी दोघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनीमधील अंतर्गत काम करणारी मंडळी तर यामध्ये सहभागी नाही ना याचा पोलीस तपास करत आहे. बॉश कंपनीतील २ कोटी रुपयांची चौकशी अजूनही सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेक राजकीय पदाधिकारी आणि नगरसेवक यांची देखील चौकशी केली आहे.