son killed father मुलाने केला बापाचा खून

निफाड तालुक्यात असलेल्या सोनेवाडी बुद्रूक येथे बबन निरभवणे या तरुणाने दारूच्या नशेत वडिलांच्या डोक्यात कु-हाडीनेजबर वार करत खून केल्याची घटना घडली आहे . यामध्ये निवृत्ती निरभवणे (७३) यांचा मृत्यू झाला आहे. son killed father

सोनेवाडी गावातील कमलेश निर्भवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी रात्री त्यांचा भाऊ बबन हा दररोज प्रमाणे दारू पिऊन घरी आला होता. त्याच्या या रोजच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी दोन मुलांना घेऊन माहेरी गेली होती. ती नुकतीच माहेरून परत आली होती, मात्र बबन रात्री दारू पिऊन घरी आल्यावर तू का गेली अस म्हणत तिच्या अंगावर हातातील कुºहाड घेऊन धावला.

तो पत्नीला मारणार इतक्यात आई आणि वडील मध्ये पडून त्याला दूर लोटत तिला मारू नको असे सांगत होते. मात्र दारूच्या नशेत असलेला बबन कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. उलट तो वडिलांना म्हणाला की,

माझी बायको व मुले माहेरी गेले, त्यास जबाबदार तुम्ही आहेत. अस म्हणत वाद घालण्यास सुरवात केली. हातातील कुऱ्हाड वडील निवृत्ती यांच्या डोक्यात घातली. वार बसताच वडील जागीच कोसळले. त्याला वडिलांना मारू नको अस म्हणत असतांना तो तेथून पळाला, मात्र तोपर्यंत वडिलांचा मृत्यू झाला. अशी माहिती फिर्यादी कमलेश निरभवणे यांनी निफाड पोलीस ठाण्यात रात्री दिली आहे.

रात्री उशिरा आरोपीला सोनेवाडी शिवारातून अटक केली. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाड घातल्याची कबुली दिली आहे. son killed father

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.