पाकीस्थान मधून सुटलेले जवान चंदू चव्हाण यांचा राजीनामा, अधिकारी वर्गावर आरोप ( व्हिडियो )

आपला शेजारील देश आणि अतिरेकी कारवाया करणारा पाकिस्तानच्या देशाच्या तावडीतून सुटका होवून देशात परत आलेले भारतीय लष्कराचे जवान चंदू चव्हाण यांनी लष्करातील अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कठोर जाचाला कंटाळून अखेर राजीनामा दिला आहे. चंदू यांच्या नुसार लष्करातील अधिकाऱ्यांचा त्रासाला आणि जाचाला कंटाळून मी राजीनामा दिला आहे. चंदू यांनी याबद्दल एक व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर टाकला असून त्यात न्याय मिळाला नाही तर मी आमरण उपोषण करेल असे देखील सांगितले आहे. चंदू चव्हाण यांनी डी. एम. रेजिमेंट श्रीमान कमान अधिकारी यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

चंदू यांचा व्हिडियो क्रमांक १

त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर हा एक व्हिडिओ टाकला आहे. त्यात म्हणतात की ” मी लेखी स्वरुपात माझ्या वरिष्ठांकडे राजीनामा दिला, मी माझ्या समस्या मागील तीन वर्षांपासून लेखी स्वरुपात दिल्या आहेत. मला पोस्ट हवी आहे आणि मला घरी जायचं आहे असंही त्यांनी सांगितलं. मात्र आपलं ऐकून घेतलं जात नाही अशी तक्रार केली आहे. ”

चंदू चव्हाण यांचा दुसरा व्हिडियो

व्हिडियोत चव्हाण म्हणतात की ‘मी पाकिस्तानातून सुटून आल्यापासून माझ्याकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टीकोन बदलला होता. पाकिस्तानातून आल्यापासून मला सतत त्रास दिला जात होता. शिक्षा दिल्याने माझे मानसिक खच्चीकरण झाले. मला न्याय मिळत नसल्याने मी त्रासाला कंटाळून राजीनामा देतो आहे” मला जर न्याय मिळाला नाही तर आमरण उपोषण करणार आहे.’ असे चंदू चव्हाण सांगितले आहे. पुढे ते म्हणतात की मी जर बोललो तर अशा गोष्टी बाहेर येतील ज्या कुणालाच ठाऊक नाहीत असे म्हणून त्यांनी त्यांचे निवेदन संपवलं आहे.

भारतीय लष्कराच्या पराक्रमी जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते, तेव्हा पराक्रमामुळे लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. त्याचवेळी २९ सप्टेंबर २०१६ रोजी ‘३७ राष्ट्रीय रायफल्स’मध्ये तैनात असलेले जवान चंदू चव्हाण नजरचुकीने भारत-पाकिस्तान सीमेवरील नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानात पोहोचले. पाक्ड्याने आधी नकार देत चंदू चव्हाण आमच्याच ताब्यात असल्याचे नंतर कबूल केले. अखेर २१ जानेवारी २०१६ रोजी चंदू चव्हाणची सुटका केली. चंदू चव्हाण हे पाकिस्तानच्या ताब्यात तीन महिने 21 दिवस होते. त्यावेळीही त्यांना त्रास सहन करावा लागला होता.

चंदू चव्हाण यांचे फेसबुक खाते लिंक : पुढीलप्रमाणे

https://www.facebook.com/chandu.chavna

नाशिकच्या बातम्या डिजिटल स्वरूपात मिळावा : फेसबुक लिंक क्लिक करा व आमचे पेज लाईक करा, शेअर करा :

https://www.facebook.com/NashikOnWeb/
फेसबुक लिंक
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.