ylliX - Online Advertising Network

आधुनिक उद्योग उभारणीत सोशल मिडिया अविभाज्य घटक – डॉ. सुरेश हावरे

‘व्यवसाय वृद्धीसाठी सोशल मीडिया प्रभावी यंत्रणा’ विषयावर दोन-दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा

आधुनिक उद्योगक्षेत्रासाठी सोशल मिडिया हा एक अविभाज्य घटक बनला असून सोशल मिडीयाचा वापर करून आपण उद्योगाला खूप उंचीवर घेऊन जाऊ शकतो, असे डॉ. सुरेश हावरे यांनी डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. social media prime roll building modern industry dr suresh haware

डॉ. मुंजे  इन्स्टिट्यूटमध्ये ‘व्यवसाय वृद्धीसाठी सोशल मीडिया प्रभावी यंत्रणा’ या विषयावर १९ व २० जानेवारी २०१८ रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यशाळेचे  उद्घाटन मुंबई येथील हावरे उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या उपस्थित झाले.

social media prime roll building modern industry dr suresh haware डॉ. सुरेश हावरे डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट व्यवसाय वृद्धीसाठी सोशल मीडिया राज्यस्तरीय कार्यशाळा आधुनिक उद्योग उभारणी

प्रथितयश उद्योजक, अणूशास्त्रज्ञ, नॅनो हौसिंगचे प्रणेते डॉ. सुरेश हावरे गेली अनेक वर्षे युवकांमध्ये उद्योजकता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. यावेळी डॉ. हावरे यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राकडे आकर्षित होण्यास सांगितले. आपल्यातला उद्योजक कसा घडला याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

भांडवलाशिवाय तुम्ही उद्योजक होऊ शकता. गरज फक्त इच्छाशक्तीची असून सोशल मिदैचा आधार घेत तुम्ही शून्यातून व्यवसाय उभारू शकता असेही वक्तव्य डॉ. हावरे यांनी केले.

उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी हे होते. यावेळी मुंजे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. नारायण दिक्षित व्यासपिठावर उपस्थित होते.

याप्रसंगी नाशिक मधील उदयोन्मुख नवलेखिका शरयू पवार हिचा सत्कार डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया या विषयावर आधारित पथनाट्याचे सादरीकरण केले.

social media prime roll building modern industry dr suresh haware डॉ. सुरेश हावरे डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट व्यवसाय वृद्धीसाठी सोशल मीडिया राज्यस्तरीय कार्यशाळा आधुनिक उद्योग उभारणी

दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत पहिल्या दिवसी सोशल मिडिया या विषयावर एमबीएच्या विद्यार्थ्यांनी पथ नाट्य सादर केले. नंतरच्या सत्रामध्ये श्री. गिरीश पगारे यांनी सोशल मिडिया व भविष्यातील तंत्रज्ञानाबद्दल अवगत केले.

डिजिटल मार्केटिंग बद्दल दीक्षितांनी केले अवगत

पहिल्या दिवसाच्या अंतिम क्षेत्रात चर्चा सत्रामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध तज्ञांनी सहभाग नोंदवला. या मध्ये सीए तथा संस्थेचे खजिनदार श्री. अतुल पाटणकर  नाशिक बीएसएनएल चे श्री. महेश कुलकर्णी, सायबर सुरक्षा तज्ञ श्री. तन्मय दीक्षित तसेच डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील श्री. अजय जोशी यांनी सोशल मिडिया च्या संबंधित क्षेत्रांतील  विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेला महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठांतून तसेच उद्योग क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी आपला सहभाग नोंदवला. डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. श्रीराम झाडे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन राखी हरयाणी, प्रिया चव्हाण, प्राजक्ता देशमुख व अंजली गरुड यांनी केले व आभार शीतल गुजराथी यांनी मानले.


आमचे फेसबुक पेज लाईक करा आणि नाशिक संबंधित सर्व अपडेट्स मिळवा : https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.