ylliX - Online Advertising Network

सोशल मिडीयाचा परिणाम : दहावीच्या निकालापूर्वी कौस्तुभने केली आत्महत्या

दुखद : दहावीच्या निकालापूर्वी कौस्तुभ ने केली आत्महत्या

नाशिक : दहावीचा निकाला काय लागणार म्हणून घाबरलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. ही घटना पाटील नगर परिसरात घडली आहे.आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

कालिका पार्क, पाटीलनगर येथे कालिदास मुंगेकर राहाततात , त्यांचा एकुलता मुलगा कौस्तुभ (१५) हा तिडके कॉलनी येथील सेंट फ्रान्सिस शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता.गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाची तारीख देण्यात येत होती. आज दहावीचा निकाल असे सोशल मीडियावर दिवसभर संदेश फिरत असल्याने आपण पास होऊ की नाही याचा कौस्तुभने धसका घेतला होता.

रविवारी (दि.११) जून रोजी कौस्तुभने मध्यरात्रीच्या सुमारास घरातील हॉलमध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील कालिदास हे पहाटे चार वाजता उठले असता त्यांना कौस्तुभने आत्महत्या केल्याचे आढळून आले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सोशल मिडियावर गंमत म्हणून अनेक समाज कंटक चुकीच्या बातम्या पेरतात त्यामुळे अनेकांना त्रास होतो. तर सतत तीच तीच गोष्ट समोर येत असल्याने दबाव निर्माण होतो.त्यामुळे याच दबावात हे कृत्य त्याने केले आहे. या गोष्टीमुळे एका निष्पाप मुलाचा जीव जातो त्यामुळे अश्या अफवा जो पसरवत असेल त्यांनी आणि इतरांनी अश्या बातम्या टाकू नयेत. माध्यमे सत्य तपासून बातम्या देतात त्यामुळे त्यांचे अधिकृत दुजारा मिळत नाही तोपर्यंत अश्या कोणत्याही बातम्या टाकणे घातक ठरते याची आपण काळजी घेणे गरजेचे आहे.

नाशिक मधील घडत असलेल्या घटना,महिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com  हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक,उत्तर महाराष्ट्र,राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती,प्रेस नोट,प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रम,आपल्या आजूबाजूला घडणारी घटना,सत्कार,सभारंभ,सांस्कृतिक कार्यक्रम,खेळ,कृषी,व्यक्ति विशेष,संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य,समाज सेवक कार्य,आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता.या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन,शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो.

प्रसिद्धी पत्रक,निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.

आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा सु तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.