ylliX - Online Advertising Network

सामाजिक न्याय दिन : राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा  राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन

नाशिक :सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आज राजर्षि छत्रपती शाहु महाराज यांचा जन्मदिन कार्यक्रम सामाजिक न्याय दिन म्हणून  साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात छत्रपती शाहु महाराज यांच्यासह महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. यावेळी प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल, विशेष अधिकारी देवीदास नांदगावकर, समाजकल्याण महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख, प्रा.अशोक सोनवणे यांचेसह शालेय विद्यार्थी-विद्यार्थ्यींनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  प्रा. सोनवणे यांनी उपस्थिताना व्याख्यानातून शाहू महाराजांच्या जीवनकार्याची माहिती दिली.

यापूर्वी सकाळी साडेआठ वाजता हुतात्मा स्मारकापासून समता दिंडीस प्रारंभ करण्यात आला. समता दिंडीस महापौर रंजना भानसी यांची प्रमुख्‍ उपस्थिती होती. समता दिडींचा मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, गंगापूर रस्ता, पोलिस आयुक्त कार्यालय मार्गाने जावून दादासाहेब गायकवाड सभागृहाजवळ  मार्गक्रमण करीत जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहु महाराज सभागृहाजवळ पोहचल्यानंतर समता दिडींचा समारोप करण्यात आला.

भाजपा कार्यालयात शाहु महाराज जयंती 

 नाशिक : भाजपा कार्यालय वसंतस्मृती येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती महानगर उपाध्यक्षा सुजाता करजगीकर  व राष्ट्रीय परिषद सदस्य नंदकुमार देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. शाहु महाराजांच्या जीवनावर सुजाता करजगीकर, रमेश कांबळे यांची भाषणे झाली.सुजय संत, विजय कुलकर्णी, निखिल जाधव, देवेंद्र चुंभळे, जयंत वैदय आदी उपस्थित होते.

महापलिकेत जनतेच्या राजाला अभिवादन 

नाशिक महानगर पालिकेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा मुख्यालयातील स्वागत कक्ष येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस मा महापौर रंजना भानसी यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास उपमहापौर प्रथमेश गीते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेते दिनकर पाटील , गटनेते शाहू खैरे,भाजपा नेते लक्ष्यमन सावजी,उपायुक्त हरिभाऊ फडोळ,रोहिदास दोरकूळकर,मुख्य लेखाधिकारी महेश बच्छाव,शहर अभियंता उत्तम पवार,कार्यकारी अभियंता गौतम पगारे,एस एम चव्हाणके,सहाय्यक आयुक्त संतोष ठाकरे, नगरसेवक अरुण पवार,जगदीश पाटील,नगरसेविका वर्षा भालेराव,शरद आहेर,अनिल भालेराव,जनसंपर्क अधिकारी यशवंत ओगले,बाळासाहेब शिंदे,हिरामण जगझाप, नितीन गंभीरे,संतोष कान्हे,विशाल घागरे,वीरसिंग कामे,लता पाटील आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.
<#Social Justice Day: Greetings to Rajshree Chhatrapati Shahu Maharaj

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.