देशातील शहरे स्मार्ट व्हावीत असे पंतप्रधान यांचे स्वप्न आहे. नाशिक स्मार्ट सिटी होतेय त्या साठी प्रयत्न सुरु आहेत. जवळपास दोन हजार कोटी रुपये मंजूर आहेत, अनेक नवीन कामे होणार आहेत. ही कामे पूर्ण होण्यासाठी सरकार आणि मी आयक्त तुकाराम मुंढे यांना नाशिकमधून जाऊच देणार नाही असे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिककरांना दिले आहे. महाकवी कालिदास कला मंदिरच्या औपचारिक उद्घाटन सभारंभ प्रसंगी महाजन बोलत होते. smart city project tukaram mundhe important govt not transfer mahajan
गिरीश महाजन यांनी सांगितले की, मी लहान होतो तेव्हा नाटकांत सहभागी होत होतो, विविध भूमिका केल्या मात्र मी छोटा कलाकार आहे. मात्र राजकारण आणि जीवनात आपल्याला अभिनय करावाच लागतो, जो ज्याला उत्तम जमला तो पुढे गेला. सोबतच त्यांनी सर्व आमदारांना चिमटा काढला ते म्हणाले की बाळासाहेब, सीमाताई, फरांदे ताई तुम्ही सुद्धा चांगला अभिनय करा अर्थात काम करा ज्यामुळे तुम्ही देखील पुढे जाता येईल, ज्याचा चांगला अभिनय तो पुढे जातो असा चिमटा काढताच नागरिक जोरदार हसले.smart city project tukaram mundhe important govt not transfer mahajan

कालिदास कलामंदीरची ओळख देशभरात व्हावी-गिरीष महाजन

कालिदास कलामंदीरची सांस्कृतिक केंद्र म्हणून असणारी ओळख नाट्य, संस्कृती व परंपराच्या रुपाने देशभरात व्हावी, अशी अपेक्षा पालकमंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केली. महाजन म्हणाले, शहराच्या सर्वांगिण विकासाकरिता नाशिक महानगरपलिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून नाशिक शहराची वेगळी ओळख निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. कालिदास कलामंदिराचे नवे रुप राज्यातील कलाकारांना प्रोत्साहन देणार आहे. पंडीत पलुस्कर सभागृहाच्या रुपाने आणखी एक हक्काचे व्यासपीठ कलाकारांना लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
कालिदास उद्घाटन प्रसंगी मनसेची गांधीगिरी! गेटवर गुलाबपुष्प देऊन सर्वांचे स्वागत
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात आली असून उर्वरीत कामे येत्या काळात पुर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून नाशिक शहराचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहाचवावे आणि कलामंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.smart city project tukaram mundhe important govt not transfer mahajan
कांबळी म्हणाले, नाशिक सांस्कृतिक वैभव जपणाऱ्या कालिदास कलामंदिराने नाट्यसृष्टीत नव्याने वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिर्घकाळ सुंदर नाट्यगृह टिकून राहण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक जबाबदारी स्विकारुन त्याकडे लक्ष दिले पाहिजे. नाट्य परीषदेच्या अडचणी सोडविण्यास तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.smart city project tukaram mundhe important govt not transfer mahajan
शिलेदार म्हणाल्या, कुसुमाग्रज यांचे योगदान लाभलेले कालिदास सुंदरतेने नव्या रुपाने कलागुणांच्या सादीरकणाकरीता मिळाले हा नाशिकच्या जनतेचा गौरव आहे. तांत्रिक बाबतीत कालिदासचे काम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्त मुंडे म्हणाले, स्मार्ट सिटी योजनेत देशात प्रथम क्रमांकावर येण्याचा शहराचा प्रयत्न आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कालिदास कलामंदिर नुतनीकरणासह महात्मा फुले कला दालन काम पुर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटनाला चालना देवून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.smart city project tukaram mundhe important govt not transfer mahajan
यावेळी महापौर भानसी, आमदार फरांदे, नगरसेवक अजय बोरस्ते यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीमती भानसी यांनी कलामंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्ताने चार दिवस सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती दिली. कार्यक्रमाला नागरिक आणि कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
smart city project tukaram mundhe important govt not transfer mahajan
नाशिकच्या बातम्या मिळवण्यासाठी Whats App ग्रुपमध्ये सामील व्हा. https://chat.whatsapp.com/8Y4rF0ioa954F7uoqTrh3H फालतू पणा केला तर ग्रुप मधून रिमुव्ह केले जाईल याची नोंद घ्या !
One thought on “स्मार्ट सिटी झाल्याशिवाय आयुक्त मुंढे यांना नाशकातून जाऊ देणार नाही- गिरीश महाजन”