ylliX - Online Advertising Network

जुळ्या बहिणींचा अपघात, एक ठार

नाशिक : सटाणा येथे ठेंगोडा या गावातून शिकवणीसाठी येत असतांना वाहनाच्या चुकीमुळे घडलेल्या अपघातात दोन जुळ्या बहिणी एकमेकांच्या विरुद्ध दिशेला फेकल्या गेल्या. या अपघातात दोन्ही बहिणी जखमी झाल्या. सटाणा शहरातील जिजामाता उद्यानाजवळ हा अपघात घडला आहे. अपघातात ज वैष्णवी आणि गीता नितीन भावसार (१७) या बहिणी जखमी झाल्या आहेत. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वैष्णवीचा नाशिकला उपचारासाठी आणताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोघींचे बाबा आठवडे बाजारात कपडे विक्री करतात तर त्यांना एका लहान भाऊ आहे. अपघात घडल्यानंतर या रस्त्यावरून एक मालट्रक येत होता. मालट्रकचे चाक एका बहिणीच्या हात आणि पायावर चालून गेल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहेनाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून देण्यात आली आहे.सटाणा पोलिसांनी ट्रक क्रमांक टी एन ६७ एच ८४४३ ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरु असल्याचे समजते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.