ylliX - Online Advertising Network

श्री संत सेना महाराज पुण्यतिथी : नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, विविध उपक्रम

संतांचे उत्सव सार्वजनिकरित्या साजरे व्हावेत- आ.नरेंद्र दराडे

नाशिक : अलिकडे प्रत्येक समाजाचे आपआपल्या संत-महाराजांना केवळ समाजापुरतेच मर्यादित करुन ठेवले आहे. वास्तवात संतांचे केलेले कार्य पाहता त्यांच्या जयंती व पुण्यतिथी सोहळे हे सार्वजनिकरीत्या साजरे करणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांनी केले. shri sant sena maharaj punyatithi nabhik samaj

नाशिकरोड येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रणित नाशिकरोड नाभिक मंडळ व नाभिक युवक मंडळाच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. दराडे पुढे म्हणाले की,  समाजाला व राज कीय नेत्यांना मोठे करण्याचे काम हे नाभिक बांधव करत असतात. त्यांच्याकडून सातत्याने समाजहित जोपासले जाते. त्यामुळे नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी मातोश्री एज्युकेशनच्या वतीने दत्तक घेतले जाईल, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले. shri sant sena maharaj punyatithi nabhik samaj

आमदार योगेश घोलप म्हणाले, ना‍भिक समाज हा शांतताप्रिय आणि सर्वांच्या सोबतीला जाणारा आहे. समाजातील बहुतांश बांधवांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या विकासासाठी त्यांचाही समावेश अनुसूचित जातीत करण्यासाठी तसेच विविध मागण्या पुर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अशोका हेल्थ केअरच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी, गुणवंत गौरव समारंभ, तसेच ऋषिकेश शेलार यांच्या संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. shri sant sena maharaj punyatithi nabhik samaj

सोहळ्याला वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, पोलिस निरीक्षक अभिजीत सोनवणे, संजय राऊत, राजेंद्र तुपे, विलास भदाने, ॲड. रामदास बोरसे, भगवान बिडवे, नारायण यादव, अशोक सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, संजय वाघ, सुभाष बिडवई, संजय गायकवाड, रमेश आहेर, बाळा कोल्हारकर, केदारनाथ गायकवाड, शांताराम जाधव, बाळा बिडवे, रितेश जाधव, राजू वडसाळ, गणेश पवार, सुनील कदम, दिलीप क्षिरसागर, बाळासाहेब निकम, नीलेश निकम, सचिन बिडवे, संतोष गायकवाड, सोनू बिडवे, चंदन वाघ, दीपक आहिरे, संदीप चित्ते, गणेश जाधव, अर्जुन निकम, विजय चित्ते, सुनील सुर्यवंशी, प्रभाकर वाघ, रामदास गायकवाड, सोनु बिडवे, विजय गायकवाड, प्रथमेश गायकवाड, यशवंत निकम आदी उपस्थित होते.

shri sant sena maharaj punyatithi nabhik samaj
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.