धक्कादायक : २१ दिवसात २५ तर जानेवारी पासून ५४ महिला, मुली बेपत्ता

नाशिक : पालकवर्गाला धक्का देणारी बातमी आहे यामध्ये नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  मागील २१ दिवसात २५ तर जानेवारी पासून ५४ महिला, मुली बेपत्ता  झाल्या आहेत. ही आकडेवारी चिंताजनक असून, विवाहिता आणि तरुण मुलींचा यामध्ये सहभाग आहे.नाशिकमध्ये या महिन्यातील 21 दिवसात 25 मुली बेपत्ता झाल्या असून  जानेवारी महिन्यापासून हा आकडा 54 वर गेला आहे. यात धक्कादायक म्हणजे यामध्ये  अल्पवयीन मुलींची संख्या अधिक आहे. शहर पोलिस आयुक्तालयातून ही माहिती देण्यात आली आहे.Shocking January total 54 women missing nashik city area

यात प्रमुखपणे  नैराश्य, एकटेपणा, न्यूनगंड, घरतील भांडणे, सासुरवास, नवऱ्याचे व्यसन,  अशा अनेक कारणामुळे मुली घर सोडून गेल्या आहेत. तर दुसरीकडे प्रेमप्रकरणातून मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण अधिक आहे, असे पोलिस तपासात स्पष्ट होते. त्यामुळे पोलिस दल सुद्धा यावर उपाय शोधत आहेत. नाशिक शहर पोलिस अधिकाऱ्यांची नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. त्यात वार्षिक परीक्षा झाल्यावर मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं निदर्शनास आले आहे.

या आकेवारीचे विश्लेषण केल असता मुली  आणि पालक यांच्यातील कमी होत जाणारा संवाद, सोशल मीडिया, मोबाईल फोनचा अतिरिक्त वापर, भौतिक सुखाच्या मागे धावणारा तरुण वर्ग अशी अनेक कारणे आहेत. चाईल्ड ट्राफिकिंग्साठी बेपत्ता मुलींचा वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

अल्पवयीन मुली तरुणी यांच्या व्यतिरिक्त आजारपण, आर्थिक विवंचना ,घरगुती वादाला कंटाळून घर सोडणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. मागील पाच वर्षात शहरातून साडेसात हजार नागरिक बेपत्ता झाले आहेत. त्यातील 6 हजार 431 जणांना पोलिसांनी शोधून काढले आहेत. मात्र अजूनही जवळपास 1100 नागरिकांना शोधण्यात अजूनतरी यश आले नाही.

Advertise With us, Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! NashikOnWeb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.