शिवशाहीने कारला अर्धा किलोमीटर फरफटले, जीवितहानी नाही

नाशिक : शिवशाहीच्या अपघातां सुरूच आहेत. शुक्रवार दि १५ मार्च रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास शिवशाही बसने समोर पुढे चालत असलेल्या कारला पाठीमागुन जोरदार  धडक दिली आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही.

येवला येथून नाशिकला निघालेल्या शिवशाही बस क्रमांक एम एच १८ बीजी १६४३ ने निफाडजवळील रिलायंस पेट्रोलपंपाजवळ पुढे  चालत असलेल्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक  एम एच १५ जी एफ ८५०२ ला पाठीमागुन जोरात धडक दिली.  धडकेत शिवशाही बसच्या पुढच्या बाजुस कार अडकली होत, असे  असतांना देखील चालकाने शिवशाही बस न थांबवता उलट भरधाव चालवत पुढे तशी नेली जवळपास अर्धा किलोमीटर निफाड जवळील शांतीनगर त्रिफुलीवर रस्ता दुभाजकावर कार बाजुला फेकली गेली होती. शिवशाहीच्या चालकाने बस तशीच भरधाव रेटत नाशिककडे जाणेऐवजी पिंपळगांव बसवंतच्या दिशेने वळवली तेव्हा स्थानिक युवकांनी शिवशाहीचा पाठलाग केला आणि चालकाला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. कारमधील दोघांनाही कोणतीही धोका निर्माण झाला नाही फक्त  किरकोळ दुखापतीवर नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचाला आहे. कारचे मोठे नुकसान झाले आहे.  शिवशाही बस निफाड पोलिस स्टेशन आवारात उभी आहे अधिक तपास निफाड पोलिस करत आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.