ylliX - Online Advertising Network

गडकरी चौक : शिवशाही बसच्या धडकेत रिक्षा चक्काचूर, तीन गंभीर जखमी

आज (दि. 21) संध्याकाळी साडेसहाच्या आसपास गडकरी चौकात शिवशाही बस आणि रिक्षाचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात रिक्षाचालकासह रिक्षात असलेले तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. Shivshahi bus rickshaw accident gadkari chowk nashik three injured

घडलेली घटना अशी की, गडकरी चौक परिसरात एन. डी. रोड पासून वळण घेताना बस थांब्याजवळ नाशिक-नंदुरबार शिवशाही बस आणि वारंवार लेन सोडणाऱ्या रिक्षामध्ये अपघात झाला. यामध्ये बसची धडक रिक्षाचा डाव्या बाजूला थेट बसल्यामुळे रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. Shivshahi bus rickshaw accident gadkari chowk nashik three injured

अपघात स्थळी मोठा आवाज झाल्याने बघ्यांनी गर्दी केली होती. वाहतूक काहीकाळ विस्कळीत होती.

Shivshahi bus rickshaw accident gadkari chowk nashik three injured
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.