शिवसेनेतून बडतर्फ सहाणेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी, विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल

नाशिक : परस्पर पक्षाला विचारत न घेता प्रचार सुरु केला असा ठपका ठेवत शिवसेनेतून हकालपट्टी केलेले शिवसेना नेते शिवाजी सहाने यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.   Shivsena party member Sahane NCP Party nomination form Legislative Council

आज सहाने यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सहाणे यांनी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यात विशेष म्हणजे शिक्षक मतदार संघाचे भाजपचे विद्यमान आमदार अपूर्व हिरे हे देखील उपस्थित होते.  Shivsena party member Sahane NCP Party nomination form Legislative Council

शिवसेनेचे नेते शिवाजी सहाणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यानंतर त्यांनी नाशिक विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेसाठी निवडल्या जाणाऱ्या सहा जागांसाठी 21 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. दरम्यान, नाशिकमध्ये शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे शिवाजी सहाणे यांनी गेल्या निवडणूक ज्यांच्याविरोधात लढवली होती, आता त्याच पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. शिवसेनेकडून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. सहाणे यांनी उघडपणे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.आता सहाने शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

Advertise With us, Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! NashikOnWeb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.