ylliX - Online Advertising Network

Shivsena news पंकजा मुंडे नाहीच तर अनेक बडे नेते संपर्कात- संजय राऊत

भाजप नेत्या पंकजा मुंडे नाहीच तर अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी  केला आहे. पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर राजकीय भविष्याबाबत पोस्ट लिहील्यानंतर त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. यावर प्रतिक्रिया देतांना त्यांनी सांगितले की, पंकजा मुंडे यांच्याबाबत १२ डिसेंबरलाच कळेल. भाजपमध्ये असंतोष आहे का याबाबत मी बोलणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिक दौऱ्यावर असलेल्या राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला  त्यावेळी ते बोलत होते.Shivsena news

बुलेट ट्रेन आमच्या माथी नको

महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ठाकरे सरकारने भारतीय जनता पार्टीवर टीका करत आहे. आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर आता पंतप्रधानांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेन आमच्या माथी नको अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवतांना याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे निर्णय घेतील असे राऊत यांनी सांगितले.

यावेळी ते म्हणाले की, राज्याची आर्थिक स्थिती गंभीर आहे. या पाच वर्षात राज्यावर कर्जाचा डोंगर आहे. केवळ प्रसिध्दीसाठी इतका खर्च केला गेल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार स्थापन झाले आहे सरकार यावर बोलेल. बुलेट ट्रेनबाबत सरकार स्थापन होण्याआधीपासून भूमिका मांडत होतो. या बुलेट ट्रेनचे ओझे आमच्या माथी नको ही आमची भूमिका आहेच. हीच भूमिका शरद पवार यांनीही मांडले असल्याचे ते म्हणाले. अजित पवारांच्या बंडाबाबत बोलतांना ते म्हणाले की अजित पवार हा अध्याय संपलेला आहे. विधानसभेत १७० चा आकडा गाठण्यासाठी पवार मेहनत करत होते हे राज्याने पाहीले. सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेईल. धोरणात्मक निर्णयावर नागपुरच्या अधिवेशनात निर्णय घेईल.


ही तर महाराष्ट्राशी बेईमानी

केंद्र सरकारचा ४०  हजार कोटींचा निधी परत पाठवण्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचा खुलासा कर्नाटकातील भाजप नेते हेगडे यांनी केला आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा निर्णय म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी असल्याचे राऊत यांनी सांगितले. फडणवीस यांनी यासाठी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असेल, तर त्यांना विधानसभेची पायरी चढण्याचा अधिकार नसल्याचे वक्तव्य राऊतांनी यावेळी केले. यासोबतच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुलासा करतील. यात काळंबेर नक्कीच असून सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासोबतच आरे प्रमाणेच नाणार प्रकल्पातील आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील असेही त्यांनी यावेळी म्हटले.

खातेवाटप मुख्यमंत्री करतील

तीन पक्षांमध्ये सूत्र ठरले आहे. सरकार उत्तम चालले आहे. विस्तार कधी करायचा हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. इतर पक्ष काय बोलतात याचा अधिकार त्यांच्याकडे नाही. कोणाला कोणते खाते द्यायचे हा निर्णय मुख्यमंत्रयांचा आहे त्यानुसार ते लवरकच निर्णय घेतील असे स्पष्ट केले. Shivsena news

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.