२०१९ च्या विधानसभा नजीक येत असल्याने विविध राजकीय पक्षांनी तयारी सुरु केल्याचे बघायला मिळत आहे. आज नाशिक महानगर पातळीवर शिवसेना पक्षाने संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे नाशिक शहर महानगरप्रमुख पदी सचिन ठाकरे आणि महेश बडवे यांची वर्णी लागली आहे. shivsena nashik mahanagar pramukh sachin marathe mahesh badve Responsible
मराठे यांच्याकडे नाशिक मध्य आणि देवळाली विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली असून बडवे यांच्याकडे नाशिक पूर्व (पंचवटी) आणि पश्चिम (सिडको-सातपूर) विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. सचिन मराठे हे शिवसेनेचे तीन वेळा नगरसेवक राहिले आहेत.
दोन जिल्हाप्रमुख नेमण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे. जबाबदारीची विभागणी आणि मतदारसंघावर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी ही रणनीती आहे. त्याचपद्धतीने दोन महानगरप्रमुख नेमण्याची सुरुवार शिवसेनेने नाशिकपासून केली आहे. shivsena nashik mahanagar pramukh sachin marathe mahesh badve Responsible
एका व्यक्तीकडे एकच पद, जबाबदारी या सूत्राप्रमाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता पद अजय बोरस्ते यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांना नाशिक शहर महानगप्रमुख या पदापासून दूर करत भार कमी केला आहे.
shivsena nashik mahanagar pramukh sachin marathe mahesh badve Responsible
Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb
Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb
Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/
Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com
Connect with Us on WhatsApp : 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).