आता व्युव्हरचना : नाशिकमध्ये राणेंना रोखतील भुजबळ, शिवसेना सुद्धा विरोधात !

बदलले नाशिकचे राजकारण; घोडेबाजाराला येणार उत

नाशिक येथील विधानपरिषद जागा नारायण राणे लढवतील अशी बातमी समोर आली आणि नाशिकचे राजकारण बदलून गेले आहे. भाजपाची जरी सत्ता नाशिकमध्ये असली तर कोणत्याही आमदाराचा हवा तसा होल्ड नाशिकच्या राजकारणावर होऊ शकला नाही. तर अनेक निर्णय घेताना पालकमंत्री गिरीश महाजन यांची वाट पहावी लागते.

दुसरीकडे मागची स्थानिक स्वराज्य विधान परिषद निवडणूक ही शिवसेना आणि राष्ट्रवादीत झाली होती, मात्र त्यावेळी विवादित निर्णय झाला आणि जागा राष्ट्रवादीने जिंकली आहे.

मात्र आता राणे यांना जर मंत्री मंडळात जायचे असेल तर निवडून येणे गरजेचे आहे. छगन भुजबळ सोडले तर मोठा राजकीय विरोध येथे नाही. मात्र राणे जर येथून आले तर शिवसेना नक्कीच त्यांना विरोध करणार असे चित्र आहे. या आगोदर अनेक इच्छुकांनी आपली तयारी सुरु केली होती. मात्र नारायण राणे यांचे नाव समोर येताच अनेकांनी थोडे थांबणेच ठरविले आहे.

शिवसेनेचा नारायण राणेंना विरोध आहे

कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे सहा महिन्यांनी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीस नाशिकमधून उभे राहणार असल्याच्या वृत्तामुळे त्यांना घेरण्यासाठी शिवसेनेने व्यूहरचना सुरू केली आहे.

त्यास कॉंग्रेसकडूनही प्रतिसाद मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे राणे यांनी नाशिकमधून निवडणूक लढविल्यास त्यांच्याविरोधात शिवसेना, कॉंग्रेस व अन्य पक्ष एकत्र येण्याची दाट शक्‍यता आहे.

नारायण राणे यांना भाजपा मंत्री पद देणार आहे.

पुढील सहा महिन्यांत विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होत आहे. त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी नगरपालिकेच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत अनुक्रमे भाजप व शिवसेनेने आपली सत्ता आणली आहे.

सध्या जिल्ह्यात भाजप क्रमांक दोनचा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने राणे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असावा असे चित्र आहे.

राणे यांनी सुरवातीपासून शिवसेना विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे नाशिकला राणे यांना विरोधासाठी सरसावले आहेत.  शिवसेनेकडे विधान परिषदेसाठी 191 मते आहेत. त्याखालोखाल भाजपकडे 166 मते आहेत; तर कॉंग्रेसकडे 58 मते आहेत.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण 31 अपक्ष नगरसेवक आहेत. त्यांची मदत घेऊन आवश्‍यक बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अपक्षांचा भाव वाढणार आहे. या जागेवर संख्या जरी भुजबळ यांच्या बाजूनी नसले तरी त्यांचे राजकीय सबंध अनेकाशी आहेत.

फोडाफोडीचे राजकरण छगन भुजबळ करू शकतात. त्यामुळे भुजबळ दोघंही मोठी अडचण ठरतील त्यामुळे दोन्ही पक्षांना छुप्या पद्धतीने भुजबळ आपल्या गोटात कसे येतील हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.