ylliX - Online Advertising Network

घरपट्टी करवाढ विरोधात शिवसेना विद्यार्थी सेनेचे आंदोलन, सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी

नाशिक : पूर्ण बहुमत असताना आयुक्त तुकाराम मुंढेंच्या खांद्यावरून करवाढ करणाऱ्या सत्ताधारी भाजपचा निषेध करण्यात आला. शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापौरांच्या रामायण बंगल्यासमोर घरपट्टीची बिले जाळत निषेध नोंदवला. यावेळी भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी रंगली.

गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीत प्रचारादरम्यान नाशिक दत्तक घेतो असे सांगून एक वर्षाने मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांना करवाढीचे मोठे बक्षीस दिले आहे अशी टीका यावेळी कारण्यात आली.

20 वर्षांनी 33 ते 56 टक्क्यांपर्यंत करण्यात आलेली ही करवाढ लवकरात लवकर रद्द करण्यात यावी अन्यथा महापौर व भाजप आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही असे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश बेलदार यांनी म्हटले आहे. करवाढ मागे न घेतल्यास आंदोलन अजून तीव्र करू असेही ते म्हणाले आहेत.

shivsena bhartiya vidyarthisena nashik agitation property tax hike nmc bjp

यावेळी शिवसेना विभाग प्रमुख अमोल सूर्यवंशी, उपविभाग प्रमुख देवा जाधव, उमेश चव्हाण, गणेश गडाख, गोकुळ मते, किशोर निकम, मनीष खेले, श्रीकांत मगर, नंदेश ढोले, रितेश साळवे, प्रवीण भडांगे, मनोज सावंत, अजिंक्य गायधनी, मयूर पगार, विहार चौधरी, विशाल पगारे, मयूर रावळे, भूषण सूर्यवंशी, विवेक पाचपांडे, जयदीप लोखंडे, तेजस ठाकरे, स्वप्नील घोडके, दत्ता गडकर, राहुल भडांगे, सुबोध अहिरे, रोशन सावकार, कार्तिक दुसाने, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.