महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार देणार नाही. यामुळे भाजपचे महापौर महापालिकेत विराजमान होणार आहे. नाशिककरांनी भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यामुळे शिवसेना उमेदवार देणार नाही, अशी घोषणा नाशिक शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी केली आहे. सभागृहात मतदान झाले तर शिवसेना तटस्थ राहणार आहे. पुढचे पाच वर्ष पालिकेत विरोधी पक्ष म्हणून शिवसेना भूमिका बजावणार असल्याचेही सेनेकडून सांगण्यात आले आहे. भाजपच्या काही नेत्यांनी पालिकेत सेना नेत्यांची भेट घेऊन आभार मानले. नाशिक महापौरपदासाठी येत्या १४ तारखेला निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी भाजपतर्फे आज रंजना भानसी आणि उपमहापौर पदासाठी प्रथमेश गीते यांनी अर्ज दाखल केले.