ylliX - Online Advertising Network

शिवकार्य गडकोट : २३ जुलैला ‘किल्ले दुन्धा’वर सुवर्णमहोत्सवी मोहीम

नाशिक २०.०७.१७ : गेल्या ६ वर्षापासून दुर्गसंवर्धनाचे काम अविरतपणे करत असलेल्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचा प्रवास ५०व्या सुवर्णमहोत्सवी श्रमदान मोहीम काढण्यापर्यंत टप्प्यावर गेला आहे.

येत्या रविवारी २३ जुलैला मालेगाव जवळच्या ‘किल्ले दुन्धा’ या गडावर ५० वी दुर्गसंवर्धन मोहीम संस्थेने आयोजित केली आहे. नाशिक जिल्ह्याच्या गडकोटांच्या संवर्धन कार्यात शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था कार्यरत असल्याबद्दल आजवर संस्थेला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

आज पर्यंत ५० गडकोट मोहिमांचा टप्पा पार करीत असताना दुर्गजागृत्ती अभियानातून गडकिल्ल्यांची व्यथा समाजात नेण्यासाठी पोस्टर, एकपात्री प्रयोग, व्याख्याने सातत्याने आयोजिली जातात. या पुढील सगळ १ वर्ष संस्थेच्या सर्व मोहिमा या संपन्न अशा कसमादे भागातील किल्ल्यांवर होणार आहेत.

या कसमादे भागातील ‘किल्ले दुन्धा’ या गडापासून या विभागाचा गडकोट मोहिमेचा प्रारंभ आहे. या मोहिमेत भाग घेण्यासाठी मोहिमेचे संस्थापक राम खुर्दळ, संयोजक योगेश कापसे मो.९८५०४९०७९० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

shivkarya gadkot sanvardhan sanstha nashik district logo

संपूर्ण तयारीनिशी मोहिमेला जाण्याची संस्थेची परंपरा आहे. निघताना केवळ प्रवास भाडे एवढाच काय तो मोहिमेचा खर्च असतो. सोबत जेवणाचा डबा, पायात ट्रेक शूज, पावसाला असल्यामुळे रेनकोट या गोष्टी सोबत घेनायचे आवाहन करण्यात आले आहे.

नियोजित दिवशी नाशिकच्या जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर जमावे. मोहिमेत सहभागी होताना संस्थेची आचारसंहिता सर्वाना लागू असेल याची नोंद घेण्याचे आवाहन मोहिमेच्या वतीने करण्यात आले आहे.

__________

नाशिकऑनवेब’च्या फेसबुक पेजला लाईक करा : https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.