ylliX - Online Advertising Network

शिवकाळात दुर्ग बांधणीसाठी, दुरुस्तीसाठी सक्षम व्यवस्था होती : सलीम शेख

नाशिक : शिवकाळात गावगाडा व्यवस्था, महसूल व्यवस्था, सैन्यव्यवस्था, कारागिरांची यंत्रणा याच सोबत अनेक यंत्रणा कार्यरत होत्या. त्या काळाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रतिकूल स्थितीतही दुर्गांची बांधणी, दुरुस्ती करताना व स्थानिक व्यवस्थापनात सर्व जातीतील कारागिरांना त्यांच्या कला कौशल्यानुसार त्या- त्या कामकाजाला नेमलेले होते. कालांतराने या व्यवस्था कमी झाल्या. त्याकाळी पाथरवट, सुतार, लोहार, कुंभार, चांभार, गवंडी यांना सतत कामात व्यस्त ठेवले जात होते असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक प्रा. सलीम शेख यांनी दुर्गजागृती व्याख्यानमालेत नाशिक येथे केले. दुर्ग व्याख्यानमालेचे हे १३ वे पुष्प होते.

पुढे शेख म्हणाले की, आता कारागिरांची जागा यंत्राने घेतली असली तरी बारा बलुतेदारी पद्धत्ती ही अत्यंत दुर्लक्षित होत आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिवकाळातील व्यवस्थापन आता व्यवस्थेने प्रत्यक्षात आणण्याची नितांत गरज आहे. यासाठी दुर्गसंवर्धन मोहिमांनी प्रेरणादाई इतिहास लाभलेल्या गडकिल्ल्यांचे वैभवाला नव्या पिढीसाठी प्रेरणास्थळे म्हणून निर्मितीसाठी झटावे तसेच गडकोटांच्या पायथ्याच्या गावांना गडकिल्ल्यांचे महत्व सांग या गावांना गडाचे मालक बनवा असे आवाहन शेख यांनी केले.

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या माध्यमातून दुर्गजागृती व्याख्यानमाला नाशिकच्या सी.बी.एस जवळ छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात नित्यक्रमाने घेण्यात येते या निमित्ताने प्रा.सलीम शेख यांनी १२व्या दुर्गव्याख्यान पुष्पात “गडकिल्ल्यांचे भूशाश्रीय नीती” या विषयावर ते बोलत होते. ते पुढे म्हणतांना त्यांनी किल्ल्यावरील व्यवस्था मांडल्या सबनिसांपासून, प्रधान, सेनापती, हवालदार, कारागीर यंत्रणा, बांधकाम आराखडे निर्मिती व्यवस्था समजून सांगितल्या. या सर्वांच्या माध्यमातून शिवकाळात दुर्गांची बांधणी झाली. त्याकाळी परकीय शत्रुंबरोबर अंतर्गत विरोधाला मोडून काढण्यासाठी सक्षम यंत्रणा शिवरायांनी निर्मिली होती. म्हणून शिवकालातील आज्ञापत्रात गडकिल्ल्यांना दुर्ग हे राज्याचे सार असे म्हंटले गेले आहे. आजच्या दुर्गांचे संवर्धन काळाची गरज आहे मात्र दुर्गांचे व्यापारीकरण होऊ देवू नका परक्यांना आणून दुर्गांची उभारणी नको, कारण दुर्गानी केलेला त्याग दिलेले कल्याणकारी स्वराज्य हे पानच जपू या. त्यांचे जतन करू या गडकिल्ल्यांच्या इतिहासापासून उर्जा घेवू या. असे ही त्यांनी अखेरीस सांगितले. याप्रसंगी जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर, जेष्ठ पत्रकार पां.भा.करंजकर, जेष्ठ विधीज्ञ दत्ता निकम, प्रा. सोमनाथ मुठाळ, शिवकार्य गडकोट मोहिमेचे संस्थापक राम खुर्दळ, शिवकार्यचे सल्लागार संदीप भानोसे, विजय निकम, यशवंत धांडे, के.सी.विसपुते, नंदकुमार कापसे, मयुरेश जोशी, नेचर क्लबचे प्रा.आनंद बोरा, पवन माळवे, पीस फौंडेशनचे पद्माकर इंगळे, निलेश ठुबे, तन्वीर शेख, सागर बोडके, अभिजित गोसावी, स्वप्नील घिया, हेमंत भावसार, रणजीत सुलगेकर, सीमाताई शिंपी, भगवान चौधरी यासह अनेक श्रोते उपस्थित होते. प्रास्ताविक राम खुर्दळ यांनी तर आभार संदीप भानोसे यांनी मानले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.