संवर्धन : शिवकार्य गडकोटच्या श्रमातून रामशेजच्या चुन्याच्या घाण्याला जीवदान

नाशिक : जागतिक वारसा सप्ताहानिमित्त शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची ७३ वी दुर्गसंवर्धन मोहीम किल्ले रामशेजवर रविवार (दि.२५) झाली. या मोहिमेत किल्ले रामशेजच्या माथ्यावर, झाडाझुडपात दडलेल्या बूजलेल्या अवस्थेत असलेल्या २५/२५ आकाराच्या गोल पुरातन चुन्याच्या घाण्याला तब्बल ७ तास केलेल्या श्रमदानातून पुनर्जीवित करण्यात आले. shivkarya gadkot kille ramshej expedition historic lime ghana conserved

Nashik News On Web Latest Marathi Batmya, shivkarya gadkot kille ramshej expedition historic lime ghana conserved, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था
फोटो मध्ये शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने ७३ व्या दुर्गसंवर्धन मोहिमेत रामशेज किल्ल्यावर श्रमदानातून चुन्याच्या प्राचीन घाण्यातील माती,दगड काढून त्याला जीवदान देण्यात आले प्रसंगी सर्व दुर्गसंवर्धक.

यामुळे किल्ले रामशेजच्या बांधणीत महत्वाची भूमिका बजावलेल्या मिश्रित चुना मळण्यासाठी दगडी चाक फिरवले जाई, तो ऐतिहासिक ठेव असलेल्या चुन्याचा घाणा सर्वाना समजेल दिसेल अश्या स्वरूपात त्याला जीवदान देण्यात आले. मात्र या घाण्याच दगडी चाक मात्र येथून गायब असल्याचे यावेळी आढळून आले.

नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ले, ऐतिहासिक वाडे, जुन्या बारवा, विहिरी, घाट, प्राचीन ज्ञात अज्ञात समाध्यांच्या जतन संवर्धन व संरक्षणासाठी कार्यरत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची नाशिकच्या पुरातत्व विभागाच्या अधिकारी जया वहाने यांच्या मार्गदर्शनाने झालेली किल्ले रामशेज स्वच्छता संवर्धन मोहीम झाली. यावेळी शौर्य, पराक्रमाचा महामेरू असलेला रामशेज किल्ल्याचे मोजमाप, मैपिंग, स्केचेस संस्थेच्या टीमने केले. shivkarya gadkot kille ramshej expedition historic lime ghana conserved

भल्या पहाटे किल्ले रामशेजवर चढाई करून त्यावरील प्लास्टिक वेचण्यात आले. तसेच जुन्या प्राचीन चुन्याचा घाणा जो गवत, झुडपे, मातीत बुजलेला होता, त्याला पुन्हा श्रमातून पुनर्जीवित करण्यात आले.

दिवसभर केलेल्या श्रमदानानंतर सायंकाळी नाशिकच्या जुन्या सरकारवाडा इमारतीत सुरू असलेल्या जागतिक वारसा सप्ताहातील सांगता कार्यक्रमास संवर्धकांनी उपस्थिती लावली. यावेळी दुर्गसंवर्धन पोस्टर प्रदर्शनीसाठी ६ दिवसात हजारो नागरिकांनी भेटी दिल्या.

या मोहिमेत पुरातत्व विभागाच्या अधिकारी जया वहाने तसेच शिवकार्य गडकोट संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, निमंत्रक प्रा. सोमनाथ मुठाळ, मोजमाप मैपिंग समितीचे अनुप गायकवाड जेष्ठ सल्लागार रविंद्र कुलकर्णी, योगेश अहिरे, श्रमदान समितीचे डॉ भरत ब्राह्मणे, भाऊसाहेब चव्हाणके, शिस्त पालन समितीचे पवन माळवे, संतोष इटणारे, विजय कदम, वनिता इटणारे, रुणेश कंसारा, दिगंबर नाठे, अविनाश क्षीरसागर, सचिन जाधव, बाल दुर्गसंवर्धक सलीम सय्यद, तनिष्का ब्राह्मणे, शिवांजली अहिरे, रुद्र चव्हाणके, सुयशा चव्हाणके, इशिता वहाणे इ उपस्थित होते.

shivkarya gadkot kille ramshej expedition historic lime ghana conserved
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.