Shivaji Maharaj Attack On Surat | छत्रपती शिवाजी महाराजांची सुरतेवरील पहिली स्वारी
छ. शिवाजी महाराजांच्या चरित्रात सुरत प्रकरण खूप महत्त्वाचे आहे. कारण सुरतेवरची छ. शिवाजी महाराजांच्या मोहीमेने महाराजांना जागतिक कीर्ती प्राप्त झाली. मुघल साम्राज्यात दिल्ली खालोखाल महत्त्व असलेले सुरत शहर एक जागतिक व्यापारी केंद्र होते. मुघल साम्राज्याची शान असलेल्या या शहरावर छ. शिवाजी महाराजांनी छापा टाकून जबरदस्त खंडणी वसूल केली. आजच्या या लेखात आपण छ. शिवाजी महाराजांच्या सुरते वरील पहिल्या स्वारीची म्हणजेच
सुरतेवर स्वारीचे प्रमुख तत्कालीन कारण –
शाइस्तेखानाने तीन वर्षे स्वराज्यात धुमाकूळ घातला होता. सलग तीन वर्षे स्वराज्यात मुघल फौजा नासधूस करीत होत्या. त्यामुळे स्वराज्याची आर्थिक घडी विस्कटली. छ. शिवाजी महाराज प्रजावत्सल होते. अशा बिकट प्रसंगी ते प्रजेकडून कसा कर वसूल करतील ? परंतु पैशाशिवाय कार्य कसे होतील ? स्वराज्यापुढे भरपूर प्रश्न होते. अनेक मोहिमा पुढे होत्या. स्वराज्याचे आरमार बळकट करायचे होते. नवीन किल्ले बांधणे वा किल्ल्यांची डागडुजी करणे. फौज उभारणे, तोफा,दारूगोळा विकत घेणे.
अशा कामांसाठी भरपूर निधी पाहिजे होता. त्यामुळे शत्रुराज्यात छापा टाकून खंडणी वसूल करणे काही गैर नव्हते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्यातील वैभवशाली अशा सुरत वर हल्ला करून खंडणी वसूल करण्याचे ठरविले.
बहिर्जी नाईक सुरतेकडे रवाना –
महाराज कोणतेही काम तयारीनिशी करीत. जी कोणतीही मोहीम ते ठरवीत असत त्याबाबतची माहिती अगोदर मिळवून त्यानुसार अंमल बजावणी करीत. महाराजांनी आपला सर्वात कुशल हेर बहिर्जी नाईक यांना सूरतेकडे रवाना केले. कारण राजगडपासून सुरत सुमारे दीडशे कोस आहे. मुघल साम्राज्यात आत खोलवर सुरत वसलेले होते. एवढ्या आत शिरून सुरते वर छापा म्हणजेच Shivaji Maharaj Attack On Surat टाकून खंडणी वसूल करून सहिसलामत परत येणे कठीण. त्यामुळे अगोदर सुरतेची इत्यंभूत माहिती काढण्यासाठी बहिर्जी नाईक यांचे कडे जबाबदारी महाराजांनी दिली.
सुरतमधील तत्कालीन परिस्थिती –
सुरत हे एक जागतिक व्यापाराचे केंद्र होते. सुरतेच्या बंदरातून भारताचा उर्वरित जगाशी व्यापार चाले. कापड, मसाल्याचे जिन्नस,चंदन, कस्तुरी, हस्तिदंताच्या सुशोभित वस्तू, अत्तर रेशीम, जरीचे कापड, नक्षीदार भांडी, गालिचे याशिवाय गुलाम आणि स्त्रियांचा खरेदी – विक्रीचा व्यापार येथे होता.
सुरतची तत्कालीन लोकसंख्या सुमारे २ लाख होती. सुरत शहरजवळून तापी नदी वाहत होती. सुरतमध्ये इंग्रज आणि डच यांच्या वखारी होत्या.
औरगजेबाने सुरतेच्या रक्षणासाठी पाच हजार सैनिकांची तजवीज केली होती. मात्र सुरत चा सुभेदार इनायतखान याने केवळ १ हजारच फौज ठेवली होती. सुरत मध्ये हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा असे श्रीमंत व्यापारी होते.
सुरतेकडे प्रयाण –
सुरतेची खडानखडा माहिती घेऊन बहिर्जी नाईक राजगडावर येऊन पोचले. महाराज देखील बहिर्जींची आतुरतेने वाट पाहत होते. बहिर्जी नाईक यांनी महाराजांना सुरतेची सर्व माहिती दिली. आणि महाराजांचा बेत पक्का झाला. सुरतेवर छाप मारून खंडणी वसूल करायचीच.
सर्व जंगी तयारी झाली. सुसज्ज लष्कर घेऊन महाराज ६ डिसेंबर १६६३ ला राजगडहुन सुरतकडे निघाले. महाराजांच्या लष्कराचा आकडा काही ठिकाणी ५ हजार आहे तर काही ठिकाणी ८ हजार दिला आहे. महाराज अगोदर त्रंबकेश्र्वर येथे गेले. तेथे गेल्यावर त्यांनी त्रंबकेश्र्वराची विधिवत पूजा केली. महाराजांनी तेथे हुल उडवून दिली की आपण औरंगाबादला जाणार आहोत. त्यामुळे औरंगाबाद कडील सर्व ठाणे सुसज्ज झाले. आणि महाराजांचा विरोध करण्यास सज्ज झाले. त्याचा परिणाम असा झाला की सुरतेचा रस्ता बिनधोक झाला. महाराज सहसा दिवसा मुक्काम करीत आणि रात्री प्रवास करीत.ShivajiMaharaj AttackOn Surat