ylliX - Online Advertising Network

शिर्डी दुहेरी हत्याकांड : गुंड पाप्या सह १२ जणांना जन्मठेप, ११ लाख दंड

नगर जिल्ह्यातील मोठे प्रकरण, नाशिकच्या मोक्का न्यायलयात निर्णय

नाशिक : शिर्डीतील प्रविण गोंदकर व रचित पटणी या दोन तरुणांचे खंडणीसाठी करण्यात आलेले अपहरण व खून खटल्याची सुनावणी नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात पूर्ण झाली आहे़. या प्रकरणी  विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र आर शर्मा गुरुवारी (दि़३) या खटल्याचा निकाल दिला असून, मुख्य आरोपी पाप्यासह 12 जणांना जन्मठेप अकरा लाख रुपये दंड तर उर्वरित जामिनावरील 12 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या गुन्ह्यामध्ये शिर्डीतील कुख्यात गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख (३२) याच्यासह त्याच्या टोळीतील 24 गुंडाचा संशयितांमध्ये समावेश होता, त्यांच्यावर मोक्कान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिकच्या जिल्हा न्यायलयातील मोक्का न्यायलयात या खटल्याची सुनावणी सुरु होती.shirdi double murder case court order 12 accused life imprisonment

काय आहे प्रकरण

या प्रकरणातील आरोपींनी १४ व १५ जून २०११ रोजी रात्रीच्या विलास पंढरीनाथ गोंदकर (४७, रा़ बिरेगाव रोड, शिर्डी, अहमदनगर) यांचा मुलगा प्रविण  त्याचा मित्र रचित पटणी या दोघांना खंडणीच्या रकमेच्या मागणीकरीता व तडजोड करण्यासाठी सुरभी हॉटेलमध्ये बोलावले होते. मात्र प्रकरण न मिटवता उलट या दोघांचे स्कॉर्पिओ वाहनातून अपहरण केले होते. त्यांना न अज्ञात स्थळी नेले  तेथून निमगाव येथील वाल्मिक पावलस जगताप यांच्या शेतात नेवून रात्रभर मारहाण केली आणि अनेक  अत्याचार केले़ होते.

या गुंडांनी हा अत्याचारावर न थांबता गोंदकर आणि पटणी या दोघा मित्रांना त्या ठिकाणी  अनैसर्गिक कृत्य करायला लावले होते. ते तसे करत असतानाच त्यांचे अश्लिल फोटोही काढले़ होते. मात्र त्यांना झालेल्या भीषण मारहाणीमुळे गोंदकर व पटणी या दोघां मित्रांचा  मृत्यू झाला होता. या आरोपींनी त्यांची नग्नावस्थेतील मृतदेह शिर्डीतील हॉटेल पुष्पांजलीसमोर नेऊन टाकली़ होती.  या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात पाप्या शेखसह त्यांच्या साथीदारांविरोधात खंडणी, खून, अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता़

तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून  २४ पैकी २३ संशयितांना अटक केली़ यामध्ये पाप्या शेख (२८, राक़ालिकानगर, शिर्डी, अहमदनगर) याचा प्रमुख सहभाग होता हे पुराव्यासह सिद्ध झाले, पाप्यासह त्याच्या टोळीतील साथीदारांवर विविध प्रकारचे २२ गुन्हे दाखल केले गेले. या सर्वांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली़ शिर्डीतील पाप्याची दहशत पाहाता हा खटला नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात चालविण्यात आला़ आहे.  यासाठी सरकारने विशेष सरकारी वकिल म्हणून अ‍ॅड. उज्वल निकम व अ‍ॅड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली होती.या संपूर्ण प्रकरणात सरकारी पक्षाने ४३ साक्षीदार तपासले़ होते.

या प्रकरणी न्यायालयाने आज निकाल देत सर्व १२  आरोपीना  जन्मठेप आणि ११ लाख दंड सुनावला आहे. यामध्ये शिक्षा झालेले आरोपी पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख (32),विनोद सुभाष जाधव (31),सागर मोतीराम शिंदे,सुनील ज्ञानदेव लहारे,आबासाहेब बाबासाहेब लांडगे (२६,),माऊली उर्फ ज्ञानेश्वर शिवनाथ गुंजाळ (२२),गनी मेहबुब सैयद (30),चिंग्या उर्फ समीर निजाम पठाण,रहीम मुनावर पठाण (23),सागर शिवाजी काळे (20),निलेश देवीलाल चिकसे (19),निसार कादीर शेख (24),

निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे राजेंद्र किसन गुंजाळ (33),इरफान अब्दुल गनी पठाण (20),मुबारक उर्फ लड्ड्या ख्वाजा शेख (32),वाल्मिक पावलस जगताप (42), दत्तात्रय बाबुराव कर्पे (35), ‍भरत पांडुरंग कुरणकर (49),बिसमिल्ला मर्द पाप्या उर्फ सलीम शेख (25)संदीप शामराव काकडे (24),हिराबाई शामराव काकडे (49),मुन्ना गफूर शेख (२४),राजू शिवाजी काळे ( २१),प्रकाश सुरेश अवसरकर (२२),

कुख्यात पाप्या शेखसह टोळीवर २२ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत़ .काही साक्षीदारांना पोलीस संरक्षण तर काही काही साक्षीदारांच्या साक्ष ही संशयितादरम्यान पडदा ठेवून नोंदविण्यात आल्या़ आहेत.

हा खून पाहतांना आरोपी उपस्थित होते मात्र दुसरा साक्षीदार नव्हता, त्यामुळे या खटल्यात पोलिसांनी सबळ परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले, पुराव्यांच्या आधारेच सरकारी वकीलांना आरोप सिद्ध करता आले आहेत. आरोपींकडून जप्त केलेले मोबाईल, त्यातील क्लिप्स, संभाषण, प्रवीण ,रचीतचे फोटो, फोन कॉल रेकॉर्ड, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे पोलिसांनी जप्त केली होती. ती सबळ पुरावा म्हणून कोर्टात सादर केले गेले आहे.

Advertise With us, Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! NashikOnWeb.news@gmail.com

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.