ylliX - Online Advertising Network

Video : शिक्षक मतदारसंघ निवडणूक : शिवसेना- शिक्षक लोकशाही आघाडी समर्थकांत वाद; मतदान केंद्रावर राडा

राष्ट्रवादी कॉंग्रेस व सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

नाशिक विभागाच्या विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी आज (दि. २५) सकाळपासून मतदान सुरू आहे. नाशिक मध्ये मात्र शिवसेना  लोकशाही आघाडीचे  समर्थकांनी एकमेकांत हाणामारी केल्याने वाद निर्माण झाला. Shikshak matadarsangh vidhan parishad nivadnuk nashik shivsena ncp karyakarta dispute

नाशिक विभागाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किशोर दराडे यांनी निवडणूकीतून माघार घेतली असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा संदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराने पसरवला अशा संशयाने हा वाद हाणामारी पर्यंत गेला.

नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सुरू होते. त्याचवेळी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शिवसेना व टीडीएफ या पक्षाच्या उमेदवारांत राडा झाला आहे. डोक्यात खुर्च्या मारत शिवीगाळ करत समर्थक एकमेकांना भिडले होते.यामध्ये व्हॉट्स अप वर आणि इतर सोशल मिडिया वर चुकीची माहिती का पसरवली असे विचारत शिवसैनिकांनी मतदानकेंद्रा बाहेरच टीडीफ उमेदवारांच्या समर्थकांना जोरदार  मारहाण केली आहे.

या निवडणुकीसाठी शिवसेना पुरस्कृत  उमेदवार किशोर दराडे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून माघार घेतली आहे, या आशयाचा संदेश टीडीएफचे उमेदवार प्रा. संदीप बेडसे यांच्या समर्थकांनी पसरवला असा मतदारात गैरसमज पसरविल्याचा आरोप यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था आमदार नरेंद्र दराडे यांनी केला. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. या दंग करणाऱ्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बी डी भालेकर शाळेच्या आवारातील परिसरात येथे हा सर्व प्रकार घडला आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या विभागात एकूण 16 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी  प्रमुख पाच उमेदवारांत सरळ लढत आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 53 हजार 335 मतदारांनी नोंदणी केली असून यात 40 हजार 412 पुरुष तर 12 हजार 923 महिला मतदार आहे.

इथे बघा व्हिडिओ :

भालेकर विद्यालयातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला असून समर्थकांमध्ये वाद होवून हाणामारी झाली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

इगतपुरी : सर सोडून जाऊ नका… विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू, जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची किमया

बेडसे आणि दराडे यांच्या काही समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Shikshak matadarsangh vidhan parishad nivadnuk nashik shivsena ncp karyakarta dispute
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.