ylliX - Online Advertising Network

शेतकरी संप सुरूच राहणार, ५ जूनला महाराष्ट्र बंदची हाक

सोमवारी (५ जून) मुंबई वगळता महाराष्ट्र बंदची हाक

नाशिक : पुणतांबेच्या कोअर कमिटीने  शेतकरी संप मागे घेतल्याचे जाहीर झाल्यानंतर संपात फुट पडल्याचे चित्र असताना आता नाशिक शेतकरी संपाचे केंद्र स्थान बनले आहे. रविवारी ( ४ जून ) ला झालेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत संप चालूच ठेवण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्याच बरोबर सोमवारी ( ५ जून ) मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनांची ही बैठक पार पडली. यात व्यापारी, आडते आणि वाहतूकदार यांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संप आज रात्री 12 वाजता पासून चालू होणार असल्याचे सांगण्यात आले.

त्याचप्रमाणे शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी पुन्हा ८ जूनला नाशिकमध्येच राज्यव्यापी परिषेदत घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पुढचे किमान चार दिवस तरी शेतकरी संप कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सभेला राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यानी मोठी गर्दी केली होती.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या सभेत नवी समिती साठ्पण करून ७ जूनला मुंबईमध्ये या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ८ जूनला नाशिकमध्येच राज्यव्यापी परिषेदत घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्यामुळे संप असाच चालू राहण्याची चिन्हे आहेत.

या सभेदरम्यान महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या बंदमध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, व्यापारी आडत्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. तसेच शेतमालाने भरलेली एकही गाडी रस्त्यावर उतरू न देण्याबद्दल सूचना करण्यात आल्या. राजकीय पक्षांचे संप हे शहरातून केले जातात. मात्र हा शेतकरी संप खेड्यांतून होऊन शहरी नागरिकांचे जीवन प्रभावित होणार असल्याचे वेगळेपण सांगण्यात आले.

असा असेल महाराष्ट्र बंद :

  • सर्वांनी उस्फुर्तपणे बंद मध्ये सहभागी व्हावे, कोणालाही संपत सहभागी व्हा असे सांगण्यात येणार नाही.
  • बंद शांततेत होणार असल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास शेतकरी सहभागी नसतील व त्यास जबाबदार राहणार नाहीत.
  • एसटी तसेच खाजगी प्रवासी वाहतूक बंद राहणार.
  • शेतमालाची एकही गाडी रस्त्यावरून धावणार नाही.

सभेच्या सुरुवातीलाच प्राथमिक स्वरुपात राजू देसले यांनी ठराव वाचून दाखविले. या सर्व ठरावांना शेतकऱ्यांची संमती घेण्यात आली.

या सभेत बोलताना कृषीतज्ज्ञ बुधाजी मुळीक यांनी कुणावरही विश्वास ठेवू नका. धोका उनहिसे होता है जिनापे भरोसा होता है असे म्हणाले. आपला बंद सरकारला कळायला हवा म्हणून बंद दरम्यान रस्त्यावरून एकही वाहन जाता कामा नये. शेतकऱ्याला गुन्हेगार म्हणाऱ्यांचा खरपूस समाचार घेताना मुळीक यांनी शेतकरी दरोडेखोर असता तर कर्जबाजारी झाला असता का? असा प्रतिप्रश्न केला. वेतन आयोग सर्वांना लागू होतो तशीच कर्जमुक्ती पूर्ण व्हायला हवी. कर्जमुक्ती देताना ऑक्टोबरची वात न बघता थेट अध्यादेश काढावा. संप आज पर्यंत टिकला असता तर सगळे गुडघे टेकत आले असते असेही शल्य त्यांनी बोलून दाखविले. हमिभावाचा  कायदा करूनच संप थाबवा असेही सांगण्यास मुळीक विसरले नाहीत.

डॉ. अजित नवले यांनी फडणवीस सरकार वर टोकाची टीका केली. संप आणि उद्याचा बंद एवढा यशस्वी करा की फडणवीस सरकारला नाक घासत आपल्याकडे यावं लागेल. शेतकरी जिंकल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही. आपल्याला कोणी लुटून खाल्लं हे ज्याला कळेल ती तरुण पिढी संपाचे नेतृत्व करेल. पूर्ण महाराष्ट्रभर आपले कार्यक्षेत्र असून उद्याचा संप असा यशस्वी करण्याचे आवाहन केले. सुकाणू समिती स्थापन करून संपाचे पुढील वाटचाल ठरवू.  शहाणे असाल तर दडपशाही थांबवा. शेतकर्यांवरील केसेस मागे घ्या अशी मागणी केली.

यावेळी संप काळात पोलिसांनी शेतकऱ्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत , सरकराने फक्त आश्वासन देऊ नये तर अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली. यापुढे संप अधिक मोठा आणि व्यापाक करण्यात येणार आहे.

बैठकीत शेतकऱ्यांचा रोष बघावयास मिळाला. शेतकऱ्यांना वारंवार शांत राहणायचे वाहन करत असताना हा संप केवळ शेतकऱ्यांचा आहे असे सांगण्यात येत होते. दरम्यान या बैठकीला रघुनाथ दादा पाटील उपस्थित राहू शकले नाही. त्याचबरोबर डॉ. गिरीधर पाटील यांना बोलण्याशी संधी देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सभेस हंसराज वडघुले, गोकुळ काकड, जिल्हा परिषद सदस्य, आदी नेते उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.