ylliX - Online Advertising Network

सरकार विरोधात लवकरच असहकार आंदोलन – शरद पवार

सरकारची नियत नाही आता सामूहिक शक्तीची ताकद सरकारला दाखविण्याशिवाय गत्यंतर नाही असे आता दिसू लागले आहे.  शेती व शेतीशी संबंधित साधनसामग्रीशी संबंधित सर्व प्रकारचे कर्ज सरकारने माफ करावे असे सध्या तरी चित्र आहे. मात्र  मुख्यमंत्री फडणवीस यांची सरसकट कर्जमाफी फसवी आहे. यामध्ये शेतकरी कर्जमाफीला  सरसकट ला 2017 उलटला पण अंमल नाही झाला नाही, या सरकारची ही दानत नाही अशी टीका माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी केली आहे.तर दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास सरकारविरूद्ध शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही असहकार आंदोलन सुरू करू. नाशिक येथे झालेल्या शेतकरी, शेतमजूर अभियानअंतर्गत राज्यस्तरीय शेतकरी प्रतिनिधी अधिवेशनमध्ये  ते प्रमुख पाहुणे   म्हणून बोलत  होते.

शरद पवार यांनी चौफेर बाजूंनी आज सरकारवर टीका केली आहे. यामध्ये प्रमुखपणे शेतकरी कर्जमाफी, नोटबंदी मुळे झालेले नुकसान यावर सरकारवर सडकून टीका केली आहे. तर शेतकरी वर्गाने आत्महत्या करू नये म्हणून त्यांनी विंनती सुध्दा केली आहे.

आपल्या देशात इंधन यावर तर कोणतेच नियंत्रण सरकारचे दिसून येत नाही नवीन कर लागू झाला आणि तेल  संदर्भात देशात लगेच  लूट सुरू झाली आहे. यामध्ये रोज इंधनाच्या किंमती वाढत आहे. त्यामुळे सर्व नागरिक संतापले आहेत. तर दुसरीकडे सर्वात दुर्दैवी निर्णय झाला आहे तो म्हणजे नोट बंदी होय. या बंदी नंतर आपल्या देशाची अर्थव्यवस्था उद्वस्थ झाली झाली आहे.कोणता फायदा झाला हे कोणालाही सांगता येत नाही असे पवार यांनी मत व्यक्त केले आहे.

शेतीवर मत व्यक्त करतांना पवार म्हणाले की, आपल्या देशात  आज शेतीमालाच्या किमतीची अवस्था फार भयानक आणि  बिकट झाली आहे. या नवीन सरकारी धोरणामुळे  शेतकरी उद्वस्थ झाला आहे. शेतकरी जरी वीस टक्के असला तरी त्याच्या हातात अर्थव्यवस्था आहे हे विसरू नका, शेतमालाच्या किमतीही खेळ करू नका, सरकारला परवडणार नाही. त्यामुळे सरकारने योग्य पाऊले लगेच उचलणे गरजेचे आहेत. ते पुढे म्हणाले की आज बळीराजा गप्प आहे जर शेतकरी रस्त्यावर उतरला आणि त्याने आंदोलन केले तर आपल्या राज्य आणि देशाला परवडणार नाही.

शेतकऱ्यानो आत्महत्या करू नका

नाशिक जिल्हा कृषी प्रधान जिल्हा आहे तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात याची खंत वाटते. तुम्ही असे केल्याने घर उध्वस्त होते. शेतकरी आत्महत्या नाही तर संघर्ष शोभतो. तुम्ही सांभाळा नक्की मार्ग निघणार आहे. आपल्या मागे राहणाऱ्या परिवार पहा आणि असा कोणताही मार्ग निवडू नका असे भावनिक आवाहन पवार यांनी केले आहे.

भाजपा सत्तेत आले तेव्हा कर्जमाफी देणार असे सांगितले होते. मात्र तसे काही दिसत नाही सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कर्जमाफी मुद्द्यावर टीका केली. सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे ही राष्ट्रवादीची  मागणी आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही त्यामुळे सामुदायिक ताकत दाखवण्याची वेळ आली असल्याचे पवार यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच मोठे आंदोलन करणार असून याबाबत ५ नोव्हेंबरला मोठी बैठक होणार आहे. आम्ही सरकारला अल्टीमेट देणार असून,  होणाऱ्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार आहे. बैठकीला शरद पवारदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.