रेव्ह पार्टी शाहरुख खानचा मुलगा एनसीबीच्या ताब्यात

काल रात्री झालेल्या कारवाईनंतर एनसीबीने आर्यन खानचे नाव गुप्त ठेवले होते. मात्र, आता आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे.shahrukh khans son

मुंबई: अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले आहे. काल रात्री झालेल्या कारवाईनंतर एनसीबीने आर्यन खानचे नाव गुप्त ठेवले होते. मात्र, आता आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे.

एनसीबीने रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत. आता थोड्याचवेळात या सगळ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली जाईल. त्यानंतर आर्यन खानसह आठ जणांची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना किला कोर्टात हजर करण्यात येईल. यावेळी आर्यन खानची रवानगी पोलीस कोठडीत होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

एनसीबी सूत्रांनी सांगितलं की, त्या बड्या अभिनेत्याच्या मुलानं चौकशी दरम्यान सांगितलं की, त्याला व्हिआयपी गेस्ट म्हणून तिथं बोलवलं होतं. त्याच्याकडून क्रुझवर येण्यासाठी कुठलीही फी घेतली नव्हती. त्यानं म्हटलं आहे की, माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलावलं गेलं. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या लोकांची आज चौकशी होणार आहे. अद्याप कुणाला अटक केलेलं नसल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे. आज चौकशीदरम्यान नेमकी काय माहिती समोर येतेय याकडे लक्ष लागून आहे. सोबतच त्या बड्या अभिनेत्याच्या मुलाला अटक केली जाईल का? हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

क्रुझवर कसं पोहोचलं ड्रग्ज

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांनी आपल्या पॅंट, अंडरवेअर, कॉलरच्या सिलाईमध्ये तसंच महिलांनी आपल्या पर्सच्या हॅंडलमध्ये लपवून आणलं होतं.

नेमकं काय घडलं?

प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ही रेव्ह पार्टी सुरु होती. या क्रूझवर फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी निघून ही बोट सोमवारी मुंबईत परतणार होती. या क्रूझवर हायप्रोफाईल रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती. हायप्रोफाईल पार्टी असल्याने एनसीबीने शेवटपर्यंत या ऑपरेशनविषयी गुप्तता बाळगली होती.

आठ तासांहून अधिक वेळ कारवाई
ही कारवाई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या टीमकडून करण्यात आली. आठ तासांहून अधिक वेळ क्रुझवर कारवाई सुरु होती. सूत्रांनी सांगितलं की, ही क्रुझ मुंबईवरुन गोव्याला चालली होती. जशी ही क्रुझ मुंबईवरुन निघाली तशी ड्रग्ज पार्टी सुरु झाली. एनसीबीची टीम आधीपासूनच क्रुझवर होती. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळाल्यानंतर क्रुझ मुंबईकडे वळवण्यात आली. shahrukh khans son

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.