Shivshahir Babasaheb Purandare ज्येष्ठ इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन

पुणे :  nashikonweb – मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचे निधन झाले आहे. बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. नुकताच त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या निधनाने प्रतिभावंत व्यक्तीमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.Shivshahir Babasaheb Purandare

बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवड येथे 29 जुलै 1922 रोजी झाला होता. ते पुण्यातच स्थायिक झाले. त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत काम केले. याच ठिकाणी त्यांची इतिहास संशोधक म्हणून वाटचाल सुरु झाली. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) 2015 सालापर्यंत तब्बल 12 हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत.

बाबासाहेबांचे लेखन

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी तसेच नाट्यलेखन व जाणाता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. जाणता राजा (Janta Raja) या महानाट्याचे 1250 हून अधिक प्रयोग झाले आहेत. जाणता राजा या महानाट्याचा पहिला प्रयोग 1984 मध्ये झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची आर्थिक मदत केली. बाबासाहेब पुरंदरे यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2019 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने (Padma Vibhushan Award) त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
===================
“असा अलौकिक शिवआराधक होणे नाही.. शिवशाहीर शिव चरणी लीन…!”– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केले आहे. शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोकही व्यक्त केला आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, काही महिन्यांपूर्वीच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शंभरीत पदार्पणानिमित्त अभिष्टचिंतनाचा योग आला होता. त्यावेळीही बाबासाहेबांनी आपल्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे प्रकृती अस्वास्थ्यावर मात करत सगळ्यांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्या शतायुष्याचा ऊर्जास्त्रोत राहीला आहे. त्यासाठी त्यांनी शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत असा मुलूख पालथा घालण्यासाठी जीवाचे रान केले. जिथे-जिथे महाराजांचा स्पर्श झालेल्या वस्तू, वास्तू आणि गडकोट-किल्ले तिथे-तिथे बाबासाहेब पोहचले. त्यांनी संदर्भ, माहिती गोळा केली, अभ्यास-संशोधन केले आणि तितक्याच तन्मयतेने शिवमहिमा केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगभर पोहचविला. घरा-घरात शिवभक्त निर्माण व्हावेत आणि या शिवभक्तांना त्यांच्या आराध्याच्या तेजःपुंज पैलूंचे दर्शन घडवावे, यालाच बाबासाहेबांनी जीवन कार्य मानले. दिगंतरात विलीन झाल्यावरही ते तिथेही शिवराय चरणी लीन होतील. शिवमहिमा, शिवरायांच्या दिगंत किर्तीची कवने लिहिण्यात आणि ती तडफदार आवाजात, आवेशात पोहचवण्यासाठी दंग होतील. पुरंदरेवाडा हा अनेकांसाठी अनेक अर्थांनी आधार होता. हा आधारवड त्यांच्या निधनामुळे अंतर्धान पावला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला परंपरा क्षेत्राला एका व्रतस्थ आणि ऋषीतुल्य अशा मार्गदर्शकाची उणीव भासत राहील. शिवचरित्राच्या अखंड पारायणालाच आयुष्य मानणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो अशी जगदंबा चरणी प्रार्थना. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

=======================

सांस्कृतिक विश्वाची  हानी; एक अध्याय पडद्याआड – उपमुख्यमंत्री अजित पवार
“ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्त्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.”  अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.Shivshahir Babasaheb Purandare

 
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.