अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार

अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार

नाशिक : धमकी देत आणि पाठलाग करत बळजबरी दुचाकीवर बसवून नेवून स्वतःच्या घरी नेत अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी घडली असून १६ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली असता पोलिसांनी कारवाई केली आहे. प्रकारांतील संशयितास पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे.

पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात बलात्कार व लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. फिर्यादीनुसार  यात तक्रारदार ही मंगळवारी (दिनांक १२ ) रोजी  अल्पवयीन शाळकरी मुलगी पुणेरोडवरील आपल्या शाळेत गेली.

शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी ती सिद्धार्थनगर बसस्टॉपवर उभी होती. तेव्हा पंचवटीतील ओळखीचा संशयिताने मुलीस गोड बोलून स्वत:च्या घरी नेले. तिला घरी नेत बळजबरी तिच्यावर बलात्कार केला़. हे कुणाला काही सांगितले तर मुलीच्या आईवडिलांना मारून टाकण्यात येईल धमकी दिली़ पीडित मुलीने घरी पोहोचल्यानंतर आई-वडिलांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ आहे.  पोलिसांनी संशयित युवकास ताब्यात घेतले आहे़

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.